मुख्यमंञ्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा;यंदा शेजारील अहमदनगरच्या कुटूंबीयांना मिळाला पूजेचा मान…!
क्लिक2आष्टी अपडेट-आज पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीची विधीवत महापूजा करण्यात आली.परंपरेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पहाटे सपत्नीक ही पूजा केली.यावेळी गत अनेक वर्षांपासून नियमितपणे वारी करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील भाऊसाहेब काळे व त्यांच्या पत्नी मंगल काळे या दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्याचा मान मिळाला.
आषाढी एकादशीनिमित्त आज प्रथम विठ्ठलाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावून अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाची सपत्नीक महापूजा केली.विठ्ठलाची महापूजेनंतर मुख्यमंत्री आपले कुटुंब व मानाचे वारकरी काळे दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले.तिथे त्यांनी रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक करून त्यांचीही पूजा केली.महाआरतीनंतर मंदिरातील पुजाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे व काळे दाम्पत्याचा पंढरपूर मंदिर समितीकडून सत्कार करण्यात आला.