नेते जोमात;कार्यकर्ते माञ कोमात..! महाराष्ट्राच्या राजकारणावर सर्वसामान्यांची थू..थू..
क्लिक2आष्टी अपडेट-सन २०१९ साली महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या या निवडणूकीत जनतेने भाजपा-शिवसेनेला स्पष्ट बहुमत दिले.परंतु उध्दव ठाकरे यांना शिवसेनेचा मुख्यमंञी हावा होता.म्हणून त्यांनी अनैसर्गिक महाआघाडी काॅग्रेस-राष्ट्रवादी काॅग्रेसला सोबत घेत राज्यात शिवसेना,काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेसचे सरकार स्थापन झाले.अन् देवेंद्र फडणवीस यांचे पित्त खवळले अन् त्यांनी मग त्यांचे वाटोळे झाले म्हणल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणाचेच वाटोळे करून टाकले.आजच्या निर्णयाने नेते सांगतात आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी एकञ आलो पण यांच्या या निर्णयाने नेते जोमात असून,जनता माञ कोमात गेली असल्याचे चिञ सध्या महाराष्ट्रात दिसत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाची देशात थू..थू.. झाली असून,हे सर्व दिग्ग्ज नेते म्हणतात आम्ही माञ महाराष्ट्राच्या हितासाठी एकञ आलोत.यांनी सर्वांनी मिळवून संपूर्ण राज्याचे वज-वाटोळेच केले असल्याचे आत्तापर्यंत झालेल्या चार वर्षात दिसत आहे.अचानक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतात अन् सगळी राष्ट्रवादी एकञ येऊन साहेब तुम्ही राजीनामा मागे घ्या असे म्हणत टाहो फोडतात मग काका म्हणतात भाकरी फिरविणे गरजेचे आहे.आणि कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करून त्यांनी स्वत;चा स्वता:कडे दिलेला राजीनामा नामांजूर करतात.यावर भाकरी फिरवयाची म्हणत खा.सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी देतात.मग अजित पवार यांनी माञ भाकरी फिरवणे वैगेर करण्यापेक्षा पिठाच्या डब्यालाच लाथ मारली अशी चर्चा नेटक-यांमध्ये रंगली आहे.असो या सर्व प्रकरणामुळे महाराष्ट्रात आता ईडी ला आराम मिळेल एवढे माञ नक्कीच चिञ पाहवयास मिळेल.