व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

राजकीय घडामोडीनंतर मतदार संघातील समीकरणे बदलणार;आ.आजबेंची भूमिका तळ्यात-मळ्यात

आमदार आजबेंची भूमिका मतदार संघाचे चिञ बदलणार

0

क्लिक2आष्टी अपडेट-राज्यातील राजकारणात रविवारी दुपारी झालेल्या घडामोडीत अजित पवार यांचे समर्थक परळीचे राष्ट्रवादी काॅग्रेसचे आमदार धनजंय मुंडे यांनी पहिल्या चार मध्येच कॅबेनेट मंञी पदाची शपथ घेतल्याने ते आता जिल्ह्याचे पालकमंञी होणार असल्याचे निश्चीत आहे.पण या झालेल्या घडामोडीत आष्टी मतदार संघाचे विद्येमान आमदार बाळासाहेब आजबे हे थोरल्या का? धाकल्या पवारांसोबत आहेत हिच भूमिका अजून स्पष्ट केली नसल्याने आ.आजबेंची भूमिका अजूनही तळ्यात-मळ्यात असल्याचे दिसून येत आहे.
राज्याच्या राजकारणात रविवारी अचानक झालेल्या घडामोडी घडवून विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे आमदारांसह थेट सत्तेत सहभागी होऊन उपमुख्यमंञी झाले.अजित पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काॅग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत.अजित पवार यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर आमदार असल्याचा दावा केला जात आहे.आष्टी मतदार संघात सध्या राष्ट्रवादी काॅग्रेसचे विद्येमान आ.बाळासाहेब आजबे हे तर भाजपाचे विधान परिषदेवर आ.सुरेश धस हे दोन आमदार मतदार संघाला लाभले आहेत.आमदार सुरेश धस व अजित पवार यांचे सख्ख संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे.त्यामुळे जर अजित पवारांबरोबर आ.आजबेंनी सुत जुळविले तर आपल्याला काहि अडचण येईल का?आपण नेमकं कुठे थांबलं पाहिजे याची चाचपणी आमदार आजबे करत असल्याने त्यांची भूमिका तळ्यात-मळ्यात असल्याचे दिसून येत आहे.
अजित पवार सोबत गेल्यावर तोटे?
आमदार बाळासाहेब आजबे यांनी जर अजित पवार यांच्याशी जवळीक केल्यास आमदार सुरेश धस हे डायरेक्ट अजित पवारांशी कनेक्ट असल्याने मतदार संघात अडचणी निर्माण होऊन,येणा-या २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत वेगळेच चिञ दिसू शकते.त्यामुळे आमदार आजबे जरा सबुरीने निर्णय घेत असल्याचे दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.