व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आ.बाळासाहेब आजबे ना.अजित पवारांच्या कळपात दाखल;मतदार संघाच्या हितासाठी निर्णय

२०२४ ला विधानसभेचा उमेदवार कोण?

0

क्लिक2आष्टी अपडेट-महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या सत्ता संघर्षात राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात उभी फूट पडून थोरल्या पवारांविरोध्द धाकले पवार अशी लढत लागली असून,आष्टी आमदार बाळासाहेब आजबे हे कुणाला साथ देणार हे दोन दिवसापासून सस्पेन्स ठेवला होता.आज अखेर मौन सोडत आमदार बाळासाहेब आजबे हे मतदार संघाच्या हितासाठी ना.अजित पवारांच्या कळपात दाखल झाले असल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात काका-पुतण्याची प्रतिष्ठा पणाला लागली असून,आज दि.५ रोजी शरद पवार व अजित पवार यांनी दोन स्वतञं बैठका आयोजित करत कोणाच्या मागे किती आमदार ह्याचे शक्तीप्रदर्शन करत आहेत.यात आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे ह्यांनी दोन दिवसापासून चालू असलेल्या घडामोडीत कसलाच हस्तेक्षप न करत कोणतीच भूमिका जाहिर केली नव्हती.आज शेवटी मतदार संघाच्या हितासाठी आमदार आजबे हे ना.अजित पवारांच्या कळपात सामिल झाले असून,आता उरलेल्या दिड वर्षात मतदार संघात कितपत विकास होईल हे येणा-या काळातच कळेल.
२०२४ विधानसभेचा उमेदवार कोण?
वर्षावर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीची राजकीय समिकरणे अजित पवार यांच्या सत्तातरांमुळे बदली आहेत.मतदार संघात भाजप आणि राष्ट्रवादी काॅग्रेस हे दोनच पक्ष तुल्यबळ आहेत,माञ अजित पवार यांनी भाजपाशी घरोबा केल्याने हि जागा भाजपा लढविणार का?राष्ट्रवादी काॅग्रेस लढविणार त्यामुळे २०२४ ला होणार असलेल्या विधानसभा निवडणूकीत उमेदवार कोण अशी चर्चा मतदार संघात सुरू आहे.
सध्या मतदार संघात भाजपाकडून आ.सुरेश धस व माजी आ.भिमराव धोंडे तर राष्ट्रवादी काॅग्रेसकडून बाळासाहेब आजबे रिंगणात उतरिणार आहेत.माञ भाजपा राष्ट्रवादी काॅग्रेस युती झाल्यास माघार कोणी घेयची?

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.