एक सही ‘संतापाची’..वैतागलेल्या ‘कांतीची…!’ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संतापाच्या “सही” ला आष्टीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
क्लिक2आष्टी अपटेड-राज्यातील पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावरून लोकांमध्ये धुमसत असलेल्या संतापाला वाट करून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केलेल्या ‘एक सही संतापाची’ आंदोलनाला आष्टी शहरातील नागरिकांकडून रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.मनसेने उभारलेल्या फलकावर सह्या करून नागरिकांनी आपला संताप व्यक्त करीत राजकारण्यांचा निषेध केला.या निषेधात शहरातील पडेल ते काम करून आपली उपजिविका भागविणा-या कांतीला ही या राजकारण्याचा निषेध करावा वाटला अन् मनसेने उभारलेल्या एक सही संतापाची.वैतागलेल्या कांतीची सुध्दा सही केली आहे.त्यामुळे शहरात या सहीच्या अंदोलनाची चर्चा सुरू आहे.
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे.लोकांनी विश्वासाने निवडून दिलेले आमदार रातोरात पक्ष बदलू लागले आहेत.त्यामुळे विश्वास तरी कोणावर ठेवायचा अशी स्थिती मतदारांची झाली आहे.मनसेच्या या आगळया-वेगळय़ा आंदोलनास लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.रविवार दि.९ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील छ.शिवाजी महाराज चौक परिसरात मोठे फलक उभारण्यात आले होते.यामध्ये फलक लावताच शहरातील नागरिकांनी यास उत्स्फूर्त पणे प्रतिसाद दिला.या मोहिमेचे उद्याटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे,शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर,यांच्याहस्ते करण्यात येऊन,तालुकाध्यक्ष जयदिप गोल्हार,गणेश पवार,तालुकाध्यक्ष बाबासाहेब दिंडे,जिल्हा उपाध्यक्ष दिपक उंबरकर,
तालुका उपाध्यक्ष सुनिल पाचपुते,लहू भवर यांनी सह्या करून मोहिमेला सुरूवात करण्यात आली.यावेळी ‘एक सही संतापाची’ही मनसेची नाही तर लोकांची मोहीम असून लोकांना त्यांचा राग व्यक्त करण्याची संधी मनसेने उपलब्ध करून दिल्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी सांगितले.