व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

विद्युतिकरणाच्या कामामुळे अहमदनगर-न्यू आष्टी-अहमदनगर (डेमू) ट्रेनची दुसरी फेरी रद्द

0

क्लिक2आष्टी अपडेट-गेल्या दहा महिन्यापासून सुरू झालेली अहमदनग-न्यू आष्टी ह्या रेल्वेची गाड़ी क्र, 01403/01404 अहमदनगर – न्यू आष्टी-अहमदनगर या गाड़ीला प्रवाशांच्या अत्यंत कमी प्रतिसादामुळे,चालक दलाच्या कमतरतेमुळे आणि अहमदनगर ते नारायणडोह दरम्यान विद्युतिकरणाचे काम प्रगतीथावर असल्यामुळे दिनांक १३/७/२०२३ ते १३/१०/२०२३ पर्यंत रद्द करण्याचे मध्य रेल्वे प्रसाशनने निर्णय घेतला आहे.

गेल्या अनेक दिवसापासून अहमदनगर-न्यू आष्टी च्या दोन फे-या सुरू झाल्या आहेत.सोमवार ते शनिवास अहमदनगर हून सकाळी पहिली फेरी ७.४५ वा.निघून न्यू आष्टी येथे १०.१५ पोहचते तर न्यू आष्टी मधून सकाळी ११ वा.निघून दुपारी १.४५ वा.अहमदनगर मध्ये पोहचत असून,पुन्हा दुपारी दुसरी फेरी ३.४० वा,अहमदनगर मधून निघून न्यू आष्टी येथे सांयकाळी ६.१५ वा.पोहचते व न्यू आष्टी मधून सांयकाळी ७ वा.निघून राञी ९.४५ वा.पोहचते.परंतु गेल्या दोन महिन्यापासून विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर सुरू असल्याने लवकरच अहमदनग-न्यू आष्टी संपूर्ण विद्युतीकरण होणार असल्याने सोलापूर रेल्वे प्रशासनाने दि.१२/७/२०२३ ते दि.१३/१०/२०२३ पर्यंत दुसरी फेरी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.