व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आमदारकीच्या राहिलेल्या दिड वर्षात काय उकरायचे ते उकरा आमदार आजबेंच्या आरोपांना आमदार धसांनी दिले उत्तर

0

क्लिक2आष्टी अपडेट-गेल्या ३२ महिन्यात आमदारकीच्या काळात तक्रारी शिवाय एक काम धड केले नसून,हायमॅक्स दिवे,पेव्हींग ब्लाॅकचे ठोकळे कुणाच्या नातेवाईकांची आहे.हे आम्हालाच नाही तर सा-या मतदार संघाला माहित आहे.अन् पाणंद रस्ताचे कामे मी अडविले हे का?अडविले ह्याचे उत्तर मी देतोच पण आता तुमच्या आमदरीकीच्या राहिलेल्या दिड वर्षात आमचे काय?उकरायचे ते उकरा अन् माझी किंवा माझ्या नातेवाईकांच्या नावाने एक गुंठा जमीन खुंटेफळ साठवण तलावात दाखवा येणा-या आमदारकीच्या निवडणूकीत धस नावाचा उमेदवार दिसणार नाही.आणि जर यात नाव आले नाही तर तुम्ही राजकारण सोडणार का?असे आमदार आजबेंनी केलेल्या आरोपावर उत्तर देतांना आमदार धसांनी उत्तर दिले.
आष्टी येथील अव्दैतचंद्र निवासस्थानी दि.१४ रोजी शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत बोलत होते.यावेळी पुढे बोलतांना आ.सुरेश धस म्हणाले,तुमच्याकडे एवढेच दिड वर्ष आमदार आहेत. २५-१५ चे मतदार संघात कामांची सरकारी चौकशी लावली तर कामे अडवली असे होतात का? सध्याच्या आमदाराला हायमॅक्स, वाळू,ठोकळे हे सर्व तुमचेच आहेत.माझी किंवा माझ्या नातेवाईकांची एक गुंठा जमीन दाखवा जर एक गुंठा सापडली तर धस नावाचा उमेदवार दिसणार नाही.शेत रस्ते मी अडविले,थांबविले ते का? थांबविले हे विहीर,शेततळे,घरकुल महत्वाचे आहेत का? तुमच्या २०० गुत्तेदार महत्वाचे आहेत.आणि जर पाणंद रस्ताचे काम सुरू झाले तर हे सर्व कामांना मजूर भेटणार नाहीत.पाणंद रस्ते हे ऐन उन्ह्याळ्यात काम सुरू करण्यासाठी माझा विरोध होता.कारण विहीर,शेततलाव,घरकीलांचे कामे होण्यासाठी हे काम थांबविले आहेत.सर्वात चांगले काम हे आष्टी पंचायत समितीने केले आहे.जरा तालुक्यात राहिलेल्या दिडवर्षात बघावं असे अवाहन आमदार धसांनी केले.तसेच भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे सरकार आल्यानंतर जलसिंचनाची चुकीची निविदा रद्द करण्यात आली.हे टेंडर बी १ करावा म्हणून आपण मागणी केली.आणि जे जलसंपदाने मंजूर केले तेच फडणवीस साहेबांनी मान्य केले आहे.जयंत पाटील यांच्या कालावधीत महालक्ष्मी आणि लक्ष्मी इंजिनीरींग या गुत्तेदार करीत आहेत.आणि त्यांनी केलेले सर्वेक्षण मला मान्य नव्हते दि.१३/७/२०२३ रोजी कृष्णा भिमा नदी स्थिरकरणासाठी हिरवा कंदील शासनाने दिला असून,या योजनेसाठी २० हजार कोटीची तसदूर असून २३/६/२०२३ ला आष्टी येथे आपल्या जो विभाग आहेत त्या विभागाचे कार्यालयच आष्टीत होणार आहे.या अविवेशनामध्ये आपण ४०० कोटी ची मागणी जलसंपदा विभागाकडे केली आहे.आणि आपल्याला ४ टिएमसी पाण्याची मागणी केली आहे.यासाठी सुधारीत प्रशासकीय मान्यतेची मागणी ११ हजार ७०० कोटी ची करून घेतली.२ हजार ८०० हे आष्टी येथील आष्टी उपसा सिंचन क्र.३ ला मिळाले आहेत.२८/२/२०२३ ला ४६ हेक्टर जमिन घेण्यासाठी ४६ हजार कोटीचे जमिनी सांपादनासाठी विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन गावचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करत प्रश्न मार्गी लावला आहे.पुनर्वसन व ६०० हेक्टर जमीन कलम ११ नुसार मान्यता घेतली असून,हा प्रश्नही मार्गी लावला जाणार आहे तुम्ही आमदार साहेब याची काळजी करू नका बाकी आम्ही बघतोत असा टोलाही आमदार आजबेंना लगवला आहे.आत्ता पर्यंत मी कशी कशी मान्यता घेतली याचे पुरावे माझ्याकडे आहेत.मी किती पञे कुणाला पाठविली ह्याचे पुरावे सोशल मिडीयावर टाकतो तुम्ही काय पञ व्यवव्हार केला ते सांगा असे अवाहनही आमदार धसांनी केले.

खुंटेफळ साठवण तलाव होऊ नये म्हणून आमदारांच्या सास-याची याचिका
आष्टी तालुक्यात खुंटेफळ साठवण प्रकल्प व्हावा म्हणून मी लोकांचा दगडांनी मार खालला आहे.हा प्रकल्प होऊ नये म्हणून विद्येमान आमदार बाळासाहेब आजबे यांचे सासरे बलभिम सुंबरे यांनीच याचिका दाखल केली.तुमच्या कार्यकाळात तेवढी मागे घेतली तरी बरिं होईल असा टोला आमदार धसांनी लगावला आहे.
भारतीय जनता पार्टी प्रत्येक निवडणूक लढविणार
येणा-या सर्व निवडणूका आष्टी मतदार संघात मी भारतीय जनता पार्टी व एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना ही युती लढविणार असून,येणा-या २०२४ चा विधानसभेचा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मी असल्याचा दावा आमदार धसांनी केला आहे.
राम खाडे हा नाममाञ तक्रारदार
माझ्या विरोधात ज्या देवस्थान जमिनीच्या बाबतीत त्यांच्या सरकारच्या काळात तीन-चार चौकशी लावल्या ह्या फक्त राम खाडे च्या तक्रारी नसून,राम खाडे हा नाममाञ तक्रारदार असून,या पाठीमागे आमदार बाळासाहेब आजबे असल्याचा आरोपही आमदार धस यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.