व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

दोन आमदारांचे भाग्य मतदार संघाला मिळू द्या,कोणीच पिढ्यान पिढ्या आमदार राहणार नाही-माजी आ.भिमराव धोंडे

पञकार परिषदेतून दिला दोन्ही आमदारांना वडिलकीचा सल्ला

0

क्लिक2आष्टी अपडेट-आष्टी तालुका हा कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेला तालुका आहे.या तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी दोन्ही आमदारांनी सध्याच्या राज्य सरकारचा फायदा घेऊन,कायामचा प्रश्न मार्गी लावावा,या मतदार संघाचे भाग्य मोठे असून,आपल्याला दोन आमदार मिळाले आहेत.कोणीच पिढ्यान पिढ्या आमदार राहणार नाहीत.पण या दोन्ही आमदारांनी पिढ्यान पिढ्या कायमस्वरूपी पिण्याचा प्रश्न मार्गी लावावा असा सल्ला माजी आ.भिमराव धोंडे यांनी आमदार बाळासाहेब आजबे,आ.सुरेश धस यांना दिला आहे.


आष्टी येथील आनंद भवन येथे आज सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत माजी आ.भीमराव धोंडे बोलत होते.यावेळी पुढे बोलतांना माजी आ.धोंडे म्हणाले,मतदार संघातील दोन्ही आमदारांनी खुंटेफळ साठवण तलावाची मंजूरी कोणी मंजूरी केली.हे कुणाला माहित आहे का? तत्कालीन मुख्यमंञी विलासराव देशमुख यांनी कृष्णा-भिमा नदी स्थिराणातून मराठवाड्यासाठी २३ टिमसी पाणी मंजूर केले.त्यामधून आपल्या आष्टी मतदार संघाला ५.६८ टिमसी पाणी मंजूर झाले होते.परंतु लिफ्ट क्र.१,लिफ्ट क्र.२ यांना पर्यावरण खात्याची परवानगी मिळाली व लिफ्ट क्र.३ साठी मिळाली नव्हती.यासाठी मी पुढाकार घेऊन,याकामी आ.सुरेश धस यांनीही प्रयत्न करत पर्यावरण खात्याची परवानगी घेतली.कोणीही पिढ्यान पिढ्या आमदार म्हणून राहणार नाही.त्यामुळे तालुक्याच्या दृष्टीकोणातून पिढ्यान पिढ्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रश्न दोघांनी मिळवून मार्गी लावावा.वाद-विवाद सोडून देऊन पाण्यासाठी एकञ यावे.खुंटेफळ प्रकल्पासाठी होणारे शिंम्पोरा ते खुंटेफळ पाणी आणून दोन्ही आमदारांनी २०२४ च्या आत पाणी आणण्यासाठी प्रयत्न करावे,आपल्या मतदार संघाचे भाग्य चांगले असून,आपल्याला दोन आमदार मिळाले आहेत.
शेतक-यांना मदत करा
एकतर आपला तालुका कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळख आहे.आत्ता निम्मा पावसाळा संपून गेला आहे.
पण आज तारखेपर्यंत जो पावसाळ्यात पाऊस पाहिजे तो झाला नाही.त्यामुळे शेतक-यांचे खरीपाचे पिक वाया गेले आहे.शेतक-यांना शासनाने आता मदत करण्याची गरज आहे.
नगर-बीड रस्ताचा प्रश्न मार्गी लावावा
नगर-बीड रस्ता मी आमदार आसतांना ११०० कोटी रूपायांचा रस्ता मंजूर केला होता.परंतु मध्यतंरी ह्या रस्तांना स्थगिती देण्यात आली होती.आता या कामावरची स्थगिती उठवली आहे.जर या कामांसाठी या दोघांनी आमदारकी खर्च केली तर या कामांचा प्रश्न मार्गी लावावा असा सल्लाही माजी आ.धोंडे यांनी दिला.
आमदारांच्या फाटाफूटीत संधीचीं सोनं करा
राज्यात आता सर्वच पक्षाचे सरकार आले आहे.व या अधिवेशनात मोठ्या प्रमाणावर निधी मिळणार असून,या निधीतून मतदार संघात मोठ्या प्रमाणावर आगोदर रस्ते कामांना प्राधान्य देऊन,रस्ताचे प्रश्न मार्गी लावावा असेही त्यांनी सांगीतले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.