व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आ.सुरेश धस यांच्या प्रयत्नाने लोणी ते वृद्धेश्वर या ६०० कोटी रु.च्या रस्ता कामासह ५ कोटी रू.च्या दोन रस्ता कामांना मंजुरी

लोणी ते वृद्धेश्वर रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी ६० लक्ष मंजूर

0

क्लिक2आष्टी अपडेट-तालुक्यातील अहमदनगर सरहद्द,लोणी धानोरा हिवरा गंगादेवी सावरगाव ते वृद्धेश्वर या ६०० कोटी रु.किमतीच्या रस्ता कामासह आणखी ५ कोटी रु.किमतीच्या दोन रस्ता कामांना आ.सुरेश धस यांनी केलेल्या मागणीनुसार मंजुरी मिळाली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना आ.सुरेश धस म्हणाले की,हायब्रीड एनयूटी योजनेतील असलेला हा रस्ताअसून त्यातील लोणी ते धानोरा हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून या रस्त्यावरून मोठी वाहतूक असते त्यांना कायमस्वरूपी रस्ता नादुरुस्तीमुळे अडचणी निर्माण होत होत्या त्यांची कायमची परवड होत होती त्यामुळे हा रस्ता होणे आवश्यक होते.तसेच हाच रस्ता पुढे हिवरा गंगादेवी सावरगाव आणि वृद्धेश्वर पर्यंत असून हे अंतर सुमारे ५० किलोमीटर अंतराचा आहे.हा रस्ता १० मीटर रुंदीचा असल्याने विस्तीर्ण आणि दर्जेदार होणार आहे या रस्त्यामुळे दोन जिल्हे बीड आणि अहमदनगर हे एकमेकांना जोडले जाणार असून श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ,श्रीक्षेत्र कानिफनाथ आणि श्रीक्षेत्र वृद्धेश्वर या तीन देवस्थानासाठी जाणाऱ्या भाविक भक्तांना या दर्जेदार रस्त्यामुळे मोठी सुविधा मिळणार आहे.या रस्ता कामाच्या सर्वेक्षण,सविस्तर प्रकल्प अहवाल या साठी ६०.०० लक्ष रू.मंजूर झाले आहेत.या रस्ताकामा बरोबरच आष्टी तालुक्यातील रूटी ते खानापूर ३.००कि.मी.या रस्ता कामाला २ कोटी ५० लक्ष रु.आणि पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी ते चंद्रेवाडी या ४.५० कि.मी. रस्ता कामाला २ कोटी ५० लक्ष रु.मंजूर झाले आहेत त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून असलेल्या रस्ते कामांच्या मागण्या मंजूर केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.