व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

शरद पवार यांची धनजंय मुंडेच्या बालेकिल्यात सभा;लापाट अजित पवार गटाचे साहेबांना आशिर्वाद द्या ची बॅनरबाजी..!

0

क्लिक2आष्टी अपडेट-अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षाचे प्रमुख शरद पवार बंडखोरांच्या मतदारसंघात सभा घेत आहेत.शरद पवारांनी पहिली सभा छगन भुजबळांच्या येवल्यात घेतली.आता धनंजय मुंडेंचा जिल्हा असलेल्या बीडमध्ये शरद पवारांची आज जाहीर सभा होत आहे.पहिल्या सभेत छगन भुजबळांचा उल्लेख न करताही शरद पवारांनी त्यांच्याविरोधात चांगलीच वातावरण निर्मिती केली होती.आता आजच्या सभेत शरद पवार धनंजय मुंडेंचा कसा समाचार घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान,संपूर्ण राष्ट्रवादीच भाजपसोबत सत्तेत यावी आणि पक्षफूट टाळावी,अशी आग्रहपूर्वक मागणी करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व बंडखोर नेत्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची अनेक वेळा मनधरणी केली. केंद्रात सुप्रिया सुळेंना मंत्रिपदाचे आमिषही दाखवले. पण शरद पवार भाजपविरोधी भूमिकेवर ठाम राहिले.त्यामुळे आता अजितदादा गटाने शरद पवारांना उत्तरसभांमधून आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे अजित पवार गटाची पहिली उत्तर सभा बीड जिल्ह्यातच होणार आहे. शरद पवार विरुद्ध अजित पवार गटाचा पहिला सामना बीडमध्ये रंगणार आहे. शरद पवारांच्या आजच्या सभेनंतर 10 दिवसांनी म्हणजे 27 ऑगस्टलाल अजित पवार प्रत्युत्तर देणार आहे.
लापाट अजित पवार गटाची बॅनरबाजी
दरम्यान,माझे फोटो वापरल्यास कोर्टात जाणार,असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी अजित पवार गटाला दिला आहे.पवारांचा हा इशारा धुडकावत बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी बॅनरवर पवारांचा फोटो लावला आहे.”कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या” अशी विनंती मुंडे समर्थकांनी केली आहे.”शरद पवार आमचे ज्येष्ठ नेते असून आम्ही त्यांचा सत्कार करणार,”असेही बॅनरवर म्हटले असल्याने अजित पवार यांचा गटाचा लापाटपणा दिसून येऊन ह्या बॅनरने चांगलीच चर्चा रंगली आहे.
साडेबारा वाजता बीडला झाले आगमन..!
आजच्या सभेपूर्वी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या वतीने भव्य रॅलीने पवारांचे स्वागत होणार आहे. सभेसाठी शरद पवार हे छत्रपती संभाजीनगर येथून सकाळी साडेनऊ वाजता बीडकडे प्रयाण करणार आहेत.साडेबारा वाजता ते बीड शहरात दाखल झाले असून,महालक्ष्मी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे.त्यानंतर दुपारी शरद पवारांची जाहीर सभा होईल.सायंकाळी चार वाजता ते बीड येथून छत्रपती संभाजीनगर निघणार आहेत.सभेतून शरद पवारांच्या निशाण्यावर कोण असणार? ते नेमके काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.