आमदार धस-आमदार आजबे आज एकाच व्यासपीठावर;आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमास उपस्थित राहा-किशोर नाना हंबर्डे
क्लिक2आष्टी अपडेट-सन १९७२ साली आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून,त्याकाळी प्रतिष्ठीत व्यक्तींनी एकञ येऊन लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षांमध्ये रूपांतर झाले असून,याच रोपट्याचे आज आपण सुवर्ण महोत्सवी साजरी करत आहोत.या कार्यक्रमासाठी आमदार सुरेश धस व आमदार बाळासाहेब आजबे यांची प्रमुख उपस्थिती असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे अहवान आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर नाना हंबर्डे यांनी केले आहे.
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे 50 वे सुवर्ण महोत्सवी वर्षं महाविद्यालयात बरेच उपक्रम घेऊन साजरे होत आहे.त्याचाच एक भाग म्हणून 19 ऑगस्ट या दिवशी मागील 50 वर्षांत शिक्षण घेतलेल्या 1972 ते 2022 या कालावधीतील आजी माजी विद्यार्थी व शिक्षक यांचा एकत्रित स्नेहमीलन मेळावा आयोजित केला आहे.या कार्यक्रमाचे उद्याटक आ.सुरेश धस,आ.बाळासाहेब आजबे,बलभिम महाविद्यालयाचे माजी प्रचार्य डाॅ.वसंत सानप,आष्टी नगर पंचायतच्या नगराध्यक्षा श्रीमती आयशा इनायतुल्ला बेग यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शनिवार दि.१९ रोजी सकाळी ११ वा.आयोजित केला असून,ह्या कार्यक्रमानिमित्त ज्या महाविद्यालयात आपण शिक्षण घेऊन घडलो तेथील आपल्या जुन्या आठवणी परत एकदा जाग्या करण्यासाठी महाविद्यालयाला परत भेट देण्याचा दुग्धशर्करा योग या निमित्ताने सर्वं विध्यार्थ्यांना घडतो आहे तरी या कार्यक्रमासाठी शनिवारी मोठ्या संख्येने माजी विध्यार्थ्यांनीं उपस्थित राहवे असे आवाहन अध्यक्ष किशोर नाना हंबर्डे, सचिव अतुल मेहेर संचालक रत्नमाला हंबर्डे,प्रा.विश्वनाथ शिंदे, बाबासाहेब घोडके,डॉ.गणेश पिसाळ,डॉ.प्रताप गायकवाड,बाळासाहेब वर्धमाने,सुभान पठाण,प्रा.महेश चौरे,तय्यब शेख,प्राचार्य सोपान निंबोरे, मुख्याध्यापक भाग्यश्री पवार व संस्थेच्या सर्वं कर्मचारी वर्गाच्या वतीने करण्यात आले आहे.