खो-यांचा दांडा डोक्यात टाकून पत्नीचा खून;पती स्वत;हून पोलिस ठाण्यात हजर
बीड तालुक्यातील घटना
क्लिक2आष्टी अपडेट-अंगणवाडी सेविका असलेल्या पत्नीच्या डोक्यात खोऱ्याच्या दांड्याने वार करून तिचा खून केल्यानंतर पती बीड तालुक्यातील नेकनूर पोलिस ठाण्यात मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता हजर झाला. आपण पत्नीचा खून केला असल्याची कबुली त्याने नेकनूर पोलिसांना दिली.खुनाची ही घटना बीड तालुक्यातील धावज्याचीवाडी गावातघडली आहे. गुंडीराम भोसले (५०, रा.धावज्याचीवाडी, ता. बीड) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी,बीड तालुक्यातील धावज्याचीवाडी येथील मंगल भोसले (४७) या अंगणवाडीसेविका म्हणून काम करतात.पती गुंडीराम भोसले याने सकाळी सहा वाजता पत्नी मंगल हीस बोलण्यासाठी शेतात नेले.त्यानंतर शेतातील गोठ्यात सकाळी ६.३० वाजता पत्नी मंगल हिच्या डोक्यात खोऱ्याच्या दांड्याने वार करून तिचाखून केला.दरम्यान,पत्नीचा खून केल्यानंतर पती गुंडीराम भोसले हा नेकनूर ठाण्यात हजर झाला.दरम्यान,अधिक तपास ए पी आय विलास हजारे करीत आहेत.