आष्टीच्या झुंजार नारी यांची श्रावणानिमित्त भंडारदरा याञा संपन्न
क्लिक2आष्टी अपडेट-हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अधिक महत्व असून,या महिन्यापासूनच हिंदू धर्मांचे सण,उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यास सुरूवात होते.श्रावण महिन्याच्या सुरूवातीलाच श्री.नागनाथ यात्रा कंपनी हिरडगाव श्री.दत्तात्रय साळुंके महाराज व श्री.राम दत्तात्रय साळुंके आणि सौ.राजश्री भारत दळवी यांनी आयोजीत केलेल्या स्पेशल भंडारदरा ट्रिपमध्ये आष्टीच्या झुंजार नारी ग्रुपने आनंद घेतला असल्याचे ग्रुपच्या अध्यक्षा सौ.मनिषा चौरे यांनी सांगीतले.
प्रत्येक वर्षी श्री नागनाथ याञा कंपनीच्यावतीने श्रावण महिन्यात विशेष याञा काढली जाते.यावेळेस राजश्री भारत दळवी यांच्या पुढाकारातून आष्टी येथील झुंजार नारी ग्रुपने भंडार दरा ह्या सहलीतून निसर्गाचा आनंद घेतला आहे.या आयोजित केलेल्या सहलीमध्ये आष्टी येथील झुंजार नारी ग्रुपच्या अध्यक्षा सौ.मनिषा महेश चौरे,डॉ.निर्मला सोनवणे,सुवर्णा पवार,विद्या ढेरे,अश्विनी वाघोली,सविता गोरे,रजनी खाडे,आष्टी पोलीस कर्मचारी सारिका शिरसाट,मंगल कोंडे,पल्लवी कोंडे,वैशाली कदम,संगीता वनवे,सरला इंगवले,उषा हजारे यांच्यासह आदि महिला सहलीमध्ये सहभागी होत्या.