रा.प.बीड चा विभाग राज्यात प्रथम;प्रवासी,उत्पन्न,बस वापर,अपघात,इंधन बचतीचे राज्यस्तरावर झाले श्रेणीकरण
विभाग नियञंक अजयकुमार मोरे यांची माहिती
क्लिक2आष्टी अपडेट-राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने राज्यातील विभाग आणि आगारांच्या विविध घटकांच्या श्रेणीकरणात जुलै महिन्यात बीड विभागाला ८४ गुण मिळाले असून या ‘या’ मुद्यांवर मूल्यमापन विभाग महामंडळ स्तरावर राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून,हे काम सर्व कर्मचारी,वाहक,चालक,यांञिकी, प्रशासकीय कर्मचारी अधिकारी यांचे कष्ट व योगदान असल्याने हे यश मिळाले असल्याचे विभाग नियञंक अजयकुमार मोरे यांनी सांगीतले.
भौतिक आणि आर्थिक मापदंड विचारात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग आणि आगारांचे श्रेणीकरण करण्यात येते. त्यानुसार मुख्य सांख्यिकीय अधिकाऱ्यांनी जुलै २०२३ मधील विविध घटकांच्या फलनिष्पत्तीनुसार श्रेणीकरण केले.त्यानुसार बीड विभागास ८४ गुण प्राप्त झाल्याचे स महामंडळ स्तरावर प्रथम क्रमांक मिळाल्याचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी ३० ऑगस्टला पत्राद्वारे कळवून सर्व अधिकारी,चालकवाहकांचे स्वागत केले.कर्मचारी सर्व चालक,वाहक,यांत्रिक व प्रशासकीय कर्मचारी,सर्व अधिकारी,पर्यवेक्षकांच्या सामुदायिक मेहनतीमुळे विविध घटकांच्या श्रेणीकरणात राज्यातील २१ विभागांपैकी बीड विभाग प्रथम आला आहे.सर्वांच्या समन्वयातून लोकाभिमुख सेवा देऊन एस.टी. एप्रिलपासून जुलै महिन्यापर्यंत महामंडळाची प्रतिमा उंचावण्याचा सातत्याने चांगली कामगिरी केली.भारमान, इंधन बचत, मार्ग बंद वाहन स्थिती,एकूण वाहन वापर,बसचा किलोमीटर वापर व त्याचे प्रतिबस कर्मचारी गुणोत्तर,अपघात संख्या,मिळालेले उत्पन्न,नफा आणि मालवाहतूक या घटकांचे भौतिक व आर्थिक मापदंडानुसार श्रेणीकरण करण्यात येते.त्यात शंभरपैकी ८४ गुण बीड विभागाला मिळाले असून,आपला रा.प.बीड विभाग राज्यात प्रथम आल्याचे विभाग नियञंक अजयकुमार मोरे यांनी सांगीतले.