शरद पवार आज जालन्यात;पोलिसांच्या कृतीतून राज्याच्या गृहमंञ्यांची भावना दिसली
शरद पवार यांचा सरकारवर घणाघात
क्लिक2आष्टी अपडेट-मराठा आरक्षणसाठी आंतरवाली सराटी (ता. अंबड)येथे चार दिवसांपासून उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेचा व्हिडीओ राज्यभर व्हायरल झाला आहे. चेंगराचेंगरीत लहान मुले, महिलांसह 20 आंदोलक जखमी झाले आहेत. संतप्त जमावाने 15 बसेसची जाळपोळ केली. 37 पोलिसही जखमी झाले आहेत. या आंदोलकांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज जालना जिल्ह्यात येणार आहे. दरम्यान त्यांनी या घटनेवर कडक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावाला भेट देणार आहेत.तसेच अंबड रुग्णालय भेट देऊन जखमींची विचारपूस करणार आहेत.या विषयी बोलताना शरद पवार म्हणाले की,’एकदा चर्चा केल्यानंतर लाठीहल्ला करण्याची आवश्यकता नव्हती.सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांबाबत रस्त्यावर आले की,बळाचा वापर करावी ही राज्याच्या गृहमंत्र्यांची सूचना असावी.गृहमंत्र्यांच्या मनातील भावना पोलिसांच्या कृतीतून दिसली.
शरद पवार म्हणाले की,पोलिसांचा यामध्ये दोष नाही.तसे आदेश त्यांना आले असावेत.या घटनेची पूर्ण जबाबदारी राज्य सरकारमधील गृह खात्याची आहे.याचा मी तीव्र निषेध करतो.हे थांबवले नाही तर त्या ठिकाणी जावून धीर द्यावा लागेल.तसेच महाराष्ट्रात सध्या फक्त आणि फक्त हुकूमशाही चालू आहे.राज्य सरकार आणि गृह खात्यावर राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे काम असते, परंतु गृहमंत्रालयातील प्रशासकांनी पोलिस बळाचा वापर करून मराठा आंदोलकांवर तीव्र लाठीचार्ज केलेला आहे.हि अतिशय संतापजनक बाब आहे.जालन्यात झालेल्या ह्या अमानवीय घटनेला राज्याचे गृहमंत्रालय जबाबदार असून मी या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो.