शिक्षक दिनी;शिक्षीकेचा ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन
क्लिक2आष्टी अपडेट-आष्टी शहरातील एका खासगी शाळेत आज शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कार्यक्रम सुरू असतांनाच ह्रदय विकाराचा झटका आल्याने शिक्षीकेचा मृत्यू झाला.शिक्षक दिनीच त्यांना मृत्यू आल्याने शहरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की,जामखेड नगरपरिषदेचे कर्मचारी असलेले राजेंद्र गायकवाड यांच्या पत्नी सुनिता राजेंद्र गायकवाड यांचे वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.त्या आष्टी शहरातील एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या.आज दि. ५ रोजी शाळेत आयोजित शिक्षक दिनाचा कार्यक्रम सुरू असताना दुपारी १२ वाजताचे सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्या खुर्चीवर खाली कोसळल्या.त्यानंतर त्यांना आष्टी शहरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले व त्यानंतर ग्रामिण रूग्णालयात नेण्यात आले तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले असुन अत्यंसंस्कार आज दि.५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जामखेड शहरातील तपनेश्वर स्मशानभूमी येथे करण्यात येणार असल्याची माहिती समजते आहे.मयत सुनिता राजेंद्र गायकवाड यांच्या मृत्युमुळे आष्टी शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पती राजेंद्र गायकवाड व दोन मुली,जावाई,नातवंडे असा परिवार आहे.