व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

दूधात भेसळ करणा-यांवर कारवाई;आष्टी तालुक्यात ३०२५ भेसळ दूळ नष्ट,विक्रेत्यांचे धाबे दणाणले

आष्टीत पथकाची कारवाई

0

गणेश दळवी आष्टी-सणासुदीच्या काळात नागरिकांना शुद्ध दूध आणि दुधापासून तयार केलेले पदार्थ मिळावेत,या उद्देशाने यंदा राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात दूधात भेसळ करणाऱ्यांवर धडक तपासणी मोहीम १ सप्टेंबरपासून सुरू केली आहे.याअंतर्गत बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या डेअरीमध्ये भेसळयुक्त दूध आणि मिठाईसाठी आणलेला खवा आढळून आला.आष्टी तालुक्यातील हाजीपूर व ब्रम्हगांव या दोन गावातील दूध केंद्रावरील सुमारे ३०२५ लिटर दूध जप्त करून नष्ट करण्यात आले.काही नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.तपासणी मोहिमेत कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

अपर जिल्हाधिकारी समितीचे अध्यक्षअपर जिल्हाधिकारी ञिभूवन कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन या समितीत अपर पोलीस अधीक्षक,अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त,जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त आणि वैधमापनशास्त्र उपनियंत्रक हे सदस्य तर जिल्हा दूग्ध व्यवसाय विकास अधिकारी सदस्य सचिव आहेत.दूध संस्था,संकलन केंद्र, प्रोसेसिंग प्रकल्प, दूध व दूग्धजन्य पदार्थ पुरवठा करणारे,निर्मिती करणारे,विक्री करणारे,स्विट मार्ट,इतर संबंधित उद्योजक यांच्या तपासण्या धडक मोहिमेंतर्गत करण्यात येत आहे.धडक मोहिमेद्वारे कुणालाही त्रास देण्याचा उद्देश नसून दूध उत्पादक व दूध, दूग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांनी शुद्ध दर्जाचे दूध व दूग्धजन्य पदार्थ ग्राहकांना द्यावेत, हा यामागील उद्देश असल्याचे जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी एस.एम.केदार यांनी स्पष्ट केले आहे.या पथकामध्ये श्री.एस.एम.केदार जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी,झेड.के.सोनवणे दूध संकलन पर्यवेक्षक,टी.एस भोसले दुग्ध शाळा रसायन तज्ञ,एस.बी.गायकवाड अन्न सुरक्षा अधिकारी,जोगदड पोलीस कर्मचारी,वनवे,वैघ मापन शास्त्र आदि अधिकारी कर्मचारी होते.


या ठिकाणी केली पथकाने कारवाई
आष्टी तालुक्यातील हाजीपूर येथील कानिफनाथ दूध संकलन केंद्रात २५८ लिटर,ब्रम्हगांव येथील संत वामनभाऊ दूध संकलन केंद्रात १७९८ लिटर तर जय हनुमान दूध संकलन केंद्रातील ७३८ लिटर दूध व आंबाजोगाई तालुक्यातील रामदास कदम डेंगे यांच्या दूध संकलन केंद्रातील २३१ लिटर दूध असे एकूण ३०२५ लिटर दूधात संशयास्पद भेसळ आढळून आल्यामुळे नष्ट करण्यात आले आहे.तर गेवराई येथे बंगलोर स्वीट होममध्ये २३ किलो खावा नाशवंत व संयस्पद आढळून आल्याने पथकाने नष्ट केला आहे.
नागरीकांनी तक्रार करावी
नागरिकांनी समितीकडे करावी तक्रारदूध व दूग्धजन्य पदार्थाच्या वापराच्या पॅकेट्सवर अथवा डब्यांवर तारीख स्पष्ट नमूद असणे आवश्यक आहे. मुदतबाह्यपदार्थ विक्रीसाठी ठेवू नये.तपासण्यांमध्ये तसा प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ व नियमन २०११ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. भेसळ आढळल्यास जनतेने समितीकडे तक्रार करावी, असे आवाहन समिती सदस्यांनी केले आहे.
आॅन धिस स्पाॅट होणार तपासणी
किटद्वारे आॅनधिस स्पाॅट होते दूधाची तपासणीतपासणी मोहिमेदरम्यान समितीचे सदस्य व अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी जागेवरच विशेष किटद्वारे दूधाची तपासणी करतात.दूधात भेसळ आढळून आल्यास दूध जागेवरच नष्ट करण्यात येते.किटद्वारे दूधातील यूरिया,स्टार्च,शुगर,
सॉल्ट,आणि दूध पावडरचे प्रमाण तपासले जाते.प्रमाणापेक्षा जास्त भेसळयुक्त पदार्थ आढळून आल्यास विक्रेत्यांवर कारवाई करून खटले दाखल करण्यात येतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.