व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

मराठा आरक्षणासाठी चर्मकार समाजाचा तरूण टाॅवरवर..!

0

क्लिक2आष्टी अपडेट-सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून संपूर्ण समाज एक वटला असतांना आता जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी चक्क चर्मकार समाजाचा तरूण आष्टी येथील नगर-बीड रस्त्यावरील कासारी गावाजवळील टाॅवरवर तरूण चढून मराठा समाजाला आरक्षण भेटावे म्हणून टॅवरवर चढला आहे.

आष्टी तालुक्यातील वाहिरा येथील अशोक शिवाजी माने हा चर्मकार समाजाचा तरूण मराठा समाजाला आरक्षण मिळावे व आपला जालना जिल्ह्यात अंतरवली येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा देण्यासाठी मंगळवार दि.१२ रोजी सांयकाळी ६ वा.नगर-बीड महामार्गावरील कासारी जवळील टाॅवर चढून अंदोलन सुरू केले आहे.घटनास्थळी आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी भेट देऊन माने यांच्याशी संवाद साधला असता आपण जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देत असून,मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हे अंदोलन केले असल्याचे सांगीतले.
बळजबरी केली तर पेट्रोल,डिझेल ओतून घेईन
मी माझ्या स्वखुशीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून हे अंदोलन करत असून,जर मला प्रशासनाने बळजबरी किंवा दबाबाने खाली उतरण्यास सांगीतले तर मी पेट्रोल आणि डिझेल टाॅवरवर घेऊन आलो आहे.पेट्रोल अन् डिझेल सोबत असल्याचा व्हिडीओही माने याने व्हायरल केला आहे.
या आगोदरही केले अंदोलन
आष्टी तालुक्यातील वाहिरा येथील अशोक माने या आगोदरही सहा महिन्यापुर्वी बीड येथील बशिरगंज भागातील टाॅवर चढून रस्त्यासाठी अंदोलन केले होते.त्यानंतर आष्टी पंचायत समिती मध्ये रोहोयो कामाची चौकशी व्हावी म्हणून पंचायत समितीच्या टाॅवरवर चढून अंदोलन केले होते.आता पुन्हा मराठा समाजाला आरक्षण भेटावे म्हणून कासारी जवळील टाॅवर चढून अंदोलन सुरू केले आहे.त्यामुळे माने हे चांगलेच चर्चेत आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.