जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे आमदार धसांनी पालन करत;बैल पोळा साध्या पध्दतीने शेतक-यांनी साजरा करून प्रशासानाला सहकार्य करण्याचे केले अवाहन
क्लिक2आष्टी अपडेट-जिल्ह्यात लम्पी या जनावरांना होणाऱ्या चर्मरोगाच्या साथीने पुन्हा डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील ११ तालुक्यांत १६८ ठिकाणी सध्या लम्पीबाधित जनावरे आढळून आलेली आहेत.त्यामुळे पोळ्याच्या दिवशी बैलांची एकत्रित सार्वजनिक मिरवणूक काढल्यास साथीचा फैलाव होऊ शकतो.त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी याबाबत बुधवारी (१३ सप्टेंबर) आदेश काढले होते.त्या आदेशानुसार आमदार सुरेश धस यांनी पोळा सण अत्यंत साध्या पणाने करत शेतक-यांनीही या वर्षी बैलपोळा साध्या पध्दतीने साजराकरून प्रशासनाला सहकार्य करावे असे अवाहन आ.धस यांनी केले आहे.
जिल्ह्यात गोवंशीय जनावरांमध्ये होणाऱ्या लम्पी या चर्मरोगाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. सध्या १९ तालुक्यांतील १६८ ठिकाणी लम्पीबाधित जनावरे आहेत. त्यामुळे आज साजरा होणाऱ्या पोळा या सणासाठी बैलांच्या मिरवणुका काढण्यावर प्रशासनाने निर्बंध लावले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा गोठ्यातच पोळा साजरा करावा लागणार असल्याचे आमदार धस यांनी सांगीतले.पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या सर्जा-राजाचा सण म्हणजे पोळा दरवर्षी जिल्ह्यात शेतकरी बांधव हा सण उत्साहात साजरा करत असतात.मात्र, यंदा जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे.पावसाअभावी पिके सुकून गेली असल्याने उत्पन्नात मोठी घट होणार आहे.पेरणी, मशागतीचा खर्चही निघणे मुश्कील झाले आहे.शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी असताना यंदा बैलांच्या साजशृंगाराच्या साहित्याचे दरही २० टक्क्यांनी वाढले आहेत.जिल्ह्यात सरासरीच्या निम्माच पाऊस झाल्याने सर्व प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.त्यामुळे बैलांना नदी,तळ्यावर नेऊन अंघोळही घातला येणार नाही.त्यामुळे बैलपोळ्याचा उत्साह कमीच असताना दुसरीकडे, पोळ्याला बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढली जात असते.मात्र, जिल्ह्यात लम्पी या जनावरांना होणाऱ्या चर्मरोगाच्या साथीने पुन्हा डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील ११ तालुक्यांत १६८ ठिकाणी सध्या लम्पीबाधित जनावरे आढळून आलेली आहेत.त्यामुळे पोळ्याच्या दिवशी बैलांची एकत्रित सार्वजनिक मिरवणूक काढल्यास साथीचा फैलाव होऊ शकतो.यामुळे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी काढलेल्या आदेशानेच आपण पोळा हा सण साध्या पध्दतीने साजरा करत असून,या रोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतक-यांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याचे अवाहन आमदार सुरेश धस यांनी केले आहे.