खंडोबा देवस्थान जमिन प्रकरणी प्रचार्य हरिदास विधातेसह इतर दोघांना अटक;२६ संप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी
आष्टी तालुक्यातील बेलगांव येथील जमिन प्रकरणी
क्लिक2आष्टी अपडेट-तालुक्यातील बेलगांव येथे आष्टी येथील खंडोबा देवस्थानची जमिन बळकविल्या प्रकरणी आष्टी तालुक्यातील कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.हरिदास गोपीनाथ विधाते,अशोक भाऊराव माळशिखरे व बापु सिताराम खैरे यांना लाच लुचपत विभागाने चौकशीसाठी अटक करत न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दि.२६ संप्टेंबर पर्यांत पोलिस कोठडी चे आदेश दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,राम सुर्यभान खाडे यांच्या तक्रारीवरून आष्टी पोलिसांत दि.६/१०/२०२० रोजी आष्टी येथील खंडोबा देवस्थानची बेलगांव येथील असलेली जमिन हडप करण्यात आली असून,सदरील जमिन कडा येथील लाखो रूपये पगार असलेल्या आनंदराव धोंडे महाविद्यालयाचा प्राचार्य डाॅ.हरिदास विधाते व अशोक माळशिखरे,बापु खैरे यांनी घेतली असल्याचे ७/१२ वर दिसून आले.या देवस्थान जमिनीचा भोबाटा जास्त झाल्याने वरील व्यक्तींनी जमिन पुन्हा देवस्थानच्या नावे करत जैसे थे करून ठेवली.परंतु या प्रकरणी सदरील आरोपींना अटक करून त्यांची चौकशी करण्याची मागणी तक्रारदाने केल्याने आज दि.२० संप्टेंबर रोजी लाचलुचपत विभाग बीड यांनी प्राचार्य डाॅ.हरिदास गोपीनाथ विधाते,अशोक भाऊराव माळशिखरे व बापु सिताराम खैरे या तिघांना अटक करत न्यायालयासमोर हजर केले असता वरील तिन्ही आरोपींना दि.२६ संप्टेंबर पर्यत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास लाचलुचत विभागाचे पोलिस उपअधिक्षक शंकर शिंदे हे करत आहेत.