व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गावर एक कोटी रूपायांची चोरी;अमंळनेर पोलिसांत तक्रार दाखल

विद्युतकरणासाठी आणलेला ओव्हरहेड वायरची चोरी

0

क्लिक2आष्टी अपडेट-अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम सध्या सुरू आहे.या रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम सुरू असून यासाठीच्या रेल्वेच्या कंत्राट दराने आणलेली ओव्हरहेड वायर चोरून नेल्याचा प्रकार अमळनेर येथे घडला.या वायर ची किंमत ९१ लाख ५६ हजार इतकी आहे. यासंदर्भात अहमदनगर येथील रेल्वे पोलीस मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी की,अहमदनगर आष्टी बीड रेल्वे मार्गाचे काम सध्या सुरू आहे. या या कामाच्या बरोबररेल्वेच्या विद्युतीकरणाचेही काम सुरू आहेत्यासाठी अहमदनगर आष्टी आणि त्यापुढे अंमळनेर पर्यंतविद्युतीकरणाचे काम सुरू आहेत्यासाठीचे कंत्राट ENCORP POWER TRANS PVT.LTD MUMBAI या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने विद्युतीकरणासाठी अपार इंडस्ट्री सिलवासा, गुजरात येथून ४८ ओव्हर हेड वायरचे ड्रम आणले होते.त्यातील ७ ड्रम हे चोरी गेल्याचे आढळून आले.यासंदर्भात या कंपनीचे सुपरवायजर रविंदर दलाल यांनी ही बाब कळताच अहमदनगर येथील रेल्वे पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.
याची तपासणी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक कोमल देओल यांनी घटनास्थळाची जाऊन पाहणी केली.त्यानंतर अमळनेर पोलिसात तक्रार दाखल करून पाटोदा उपविभागीय अधिकारी यांनाही माहिती देण्यात आली आहे.यासंदर्भात श्वान पथकाला पाचरण करण्यात आले.या कंपनीने यासाठी ४८ OHE Wire ड्रम मागविण्यात आले होते.या वायर मध्ये तांब्याच्या धातूचा वापर केला आहे. ही साधारण साडेडहा किमी लांबीची आहे.या चोरीचा तपास करण्यासाठी पुणे,कल्याण,मुंबई सोलापूर,पनवेल पुन्हा विभागाची तपास पथके तयार करण्यात आली असल्याचे पुन्हा विभागाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.