व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

मोबाईल चोर बाजारात नागरिकांनी धरला;पोलिसांनी दहा मिनिटात सोडून दिला…!

आष्टी पोलिसांची धडाकेबाज कारवाई

0

गणेश दळवी आष्टी-शहराचा आठवडी बाजार दर रविवारी नगर-बीड रस्तावर भरत असतो या प्रत्येक आठवडी बाजारात किमान ९-१० मोबाईल चोरी होतात.कालच्या आठवडी बाजारात मोबाईल चोर मोबाईल चोरतांना नागरीकांधी धरला;आष्टी पोलिस ठाण्याला फोन केला पोलिस आर्ध्या तासाने आले मोबाईल चोराला घेऊन गेले अन् दहा मिनिटात सोडून दिले.त्यामुळे आष्टी पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईने सर्वञ कौतुक होत आहे.
याबाबत अधिक असे की,दि.२४ रोजी रविवारी आष्टी शहराचा आठवडी बाजार होता.या प्रत्येक रविवारी मोबाईल चोरणारे चोरटे बाजारात येऊन ९-१० पेक्षा जास्त मोबाईल चोरून घेऊन जातात.साधारणपणे ५ वाजण्याच्या सुमारास एका नागरीकाचा मोबाईल चोरतांना चोरटा पकडला नागरिकांनी त्याला धरून ठेवत आष्टी बाजारात कर्तव्यास असलेले पोलिस कर्मचारी राऊत यांना फोन लावला.ह्यांना माञ १०० मिटर वर असलेल्या पोलिस ठाण्यातून बाजारात येण्यासाठी २५-३० मिनिट लागले विशेष म्हणजे राऊत न येता क्षिरसागर हे आले.त्यांनी चोराला हात न लावता व्यवस्थित बोलून घेऊन गेले.त्या एक मोबाईल चोराला घेऊन जातांना सदरील पोलिस कर्मचारी यांनी हात न लावता व तो चोरही पळून न जाता पोलिस कर्मचारी बरोबर मोटार सायकलवर गेले.तोच त्या मोबाईल चोराचा दुसरा जोडीदार या साहेबांबरोबर तिघे जण ठाण्यात गेले.चौकशी वैगेरे काहिच न करता पोलिसांनी सहिसलामत या मोबाईल चोरांना सोडून दिले.पोलासांच्या या धाडसी कारवाईमुळे सर्वञ कौतुक होत आहे.
दर बाजारी मोबाईल चोरांची येते टोळी
आष्टी शहरात दर रविवारच्या आठवडी बाजारात ४-५ जणांची मोबाईल चोरणारी टोळी येते विशेष म्हणजे हे चोर पोलिसांना सलामी देऊनच येतात.त्यानंतर चोरी गेलेल्या मोबाईलची तक्रार आली तर बघू,तुमचा मोबाईल तुम्हाला संभाळता येत नाही,बिल आहे का?कुठून आलात?मोबाईल कसा गेला,आता गेला गेला तो परत सापडत असतो का?आत्तापर्यंत कोणता सापडला असे निगेटिव्ह थिकींगमध्येच त्या नागरिकाची तक्रार न घेता ठाण्यातून हाकलून लावतात.
१०० मिटर अंतरावरून येण्यासाठी पोलिसांना लागतो आर्धातास
बाजारतळ ते पोलिस ठाणे हाकेच्या अंतरावर असून साधारणपणे हे अंतर १०० मिटर आहे.आठवडी बाजारात डियुटी असलेले पोलिस कर्मचारी सकाळी बाजार भरायाच्या आगोदरच म्हणजे १० वा.येऊन मोबाईल संभाळा असे सांगून जातात अन् ऐन चारच्या दरम्यान मोबाईल चोरांचे आगमन होते अन् पोलिस गायब त्यावरही काल दि.२४ रोजी सांयकाळी ५ च्या सुमारास नागरीकांनी मोबाईल चोरतांना मोबाईल चोरास पकडले त्यानंतर राऊत पोलिस कर्मचारी यांना फोन लावला ते आलो आलो म्हणत आर्धातास झाले फक्त एवढेच सांगत होते मी आलोच त्या मोबाईल चोराला सोडू नका,नंतर १०० मि.अंतरावरून क्षिरसागर हे पोलिस कर्मचारी आले अन् मोबाईल चोरांना नागरिकांच्या तावडीतून घेऊन सहिसलामत चोराला घेऊन गेले.
वाचा उद्याच्या भागात-कसे असतात पोलिस आणि चोरांचे लागेबांधे-क्रमेश;

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.