व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

मोबाईल चोरी नाही तर हरवला म्हणून तक्रार द्या आष्टी पोलिसांचा अजब फतवा

0

गणेश दळवी आष्टी-पोलिसांनी मनात आणलं तर सुतावरून स्वर्ग गाठूण तपास मार्गी लावतात पण तपास केव्हा मार्गी लावतात तर त्यांनी मनात आणल्यावरच सध्या आष्टीच्या आठवडी बाजारातून दर रविवारी किमान दहा ते पंधरा मोबाईल चोरी होतात.त्यातील चार दोन नागरिक पोलिस ठाण्यात जातात.त्यातील तीन जणांना पोलिस आपल्या आर्वच्य भाषेत बोलूनच त्या नागरीकाला ठाण्यात उभं पण राहू वाटत नाही ते परत निघून येतात.अन् तरी एक जणानी तक्रार देयची ठरवलिच की पोलिस सांगतात तुझा मोबाईल बाजारात कसं काय हरवला? तो नागरीक सांगतो हरवला नाही चोरला आहे पण पोलिस आपला खाकी दम दाखवत मोबाईल चोरीचा नाही तर हरवल्याची तक्रार घेऊन सदरील ग्राहकाला परत पाठवून देतात असा अजब फतवा आष्टी पोलिसांनी जारी केला आहे.
आष्टी शहराचा दर रविवारी आठवडी बाजार भरतो या प्रत्येक बाजारात आष्टीचे पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळीस ह्या दोन कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे.तसेच काहि वेळेस स्वत;पोलिस निरीक्षक सहका-यांसोबत येऊन विक्रेत्यांना व नागरीकांना मोबाईल चोरांपासून साधव राहण्याची जनजागृती करतात.याबद्दल काहि दुमत नाही.परंतु मोबाईल चोर सहसहा गठत नाहीच पण एखाद्या नागरीकांनी जर चोर पकडला तर त्यावेळेस नेमके कर्तव्यावर असलेले पोलिसच बाजारात नसतात.म्हणजे चोर आणि पोलिसांची संगनमताने ठरविलेली वेळ आहे का? अशी शंका उपस्थित होते.पोलिसांच्या मागे खुप काम असते हे सहाजिक आहे पण पोलिसांच्या भरवश्यावरच सर्व सुरूळीत सुरू आहे.पण काहि पोलिसांच्या चुकीच्या वागण्यामुळे भरवश्याच्या म्हशीला टोंणगां असे म्हण्याची वेळ आष्टीकरांवर आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.