खुंटेफळ साठवण तलावाची चुकीची माहिती देऊन,नागरीकांची दिशाभूल करणे योग्य नाही-आ.सुरेश धस
आमदार सुरेश धस यांची पञकार परिषदेत माहिती
क्लिक2आष्टी अपडेट-खुंटेफळ साठवण तलावाची निविदा अंतिम टप्यात आहे.परंतु काहि दिवसापुर्वी मराठवाडा येथे झालेल्या मंञिमंडळात समावेश झाल्याचा आफवा पसरविण्यात आली पण तसे काहि शासनाने जाहिर केलेल्या पॅकेजमध्ये कुठेही खुंटेफळ साठवण तलावाचा उल्लेख येणारच नाही कारण खुंटेफळ साठवण तलावाच्या आगोदरच प्रक्रीयेत आहे.पण येथील आमदारांना जनतेला चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्यातच धन्यता वाटत असेल तर हे चुकीचे असून योग्य नसल्याचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले.
आष्टी येथील अव्दैतचंद्र या निवासस्थानी दि.२९ शुक्रवारी सांयकाळी ६ वा.आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत आमदार सुरेश धस बोलत होते.पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,दि.१७ संप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त आयोजित करण्यात आलेल्या मंञिमंडळाच्या बैठकीत आष्टी येथील खुंटेफळ साठवण तलावासाठी १३५७ कोटी मंजूर झाल्याचे येथील आमदारांनी पञकार परिषद घेऊन सांगितले.पण या मंञिमंडळाच्या बैठकीत कुठेही मंजूरी आली नाही.कारण आत्ता जाहिर झालेल्या पॅकेजमध्ये या खुंटेफळ साठवण तलावाचा कुठेही उल्लेख नसतांना फक्त प्रसिध्दीसाठी चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करणे योग्य नसल्याची प्रतिक्रीया आमदार सुरेश धस यांनी आ.बाळासाहेब आजबे यांचे नाव न घेता लगावला आहे.या साठवण तलावाच्या निविदेची प्रक्रीया फेब्रुवारी पासूनच सुरू आहे.ती आता अंतिम टप्यात असून लवकरच या साठवण तलावाची निविदा लवकरच प्रकाशित होणार असल्याचेही आमदार धस यांनी सांगितले.तसेच आपण ना.चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे कुकडीचे सर्व प्रकल्प भरले असून,ओहरफ्लो चे १२०० एनसीएफटी पाणी सोडण्यात यावे तसेच कालवा समितीची बैठक लवकरात लवकर घेण्यात यावी अशी मागणी पञाद्वारे केली आहे.