क्लिक2आष्टी अपडेट-रायफलमधून पाच फैरी डोक्यात झाडून राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने आत्महत्या केली. शनिवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास शहरातील एसआरपीएफ परिसरात हा प्रकार घडला. सचिन गोविंद भदरगे असे मृताचे नाव आहे.
कौटुंबिक ताणतणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवली जात आहे.सचिन शनिवारी सकाळी ड्यूटीवर होते. त्यांनी स्वत:कडील रायफलमध्ये पाच गोळ्या लोड केल्या. त्यानंतर खाली झोपले व डोक्याला रायफल लावून पाच फैरी झाडल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गोळ्या फायर झाल्याचा आवाज येताच, इतर जवानांनी तिकडे धाव घेतली. त्यानंतर याची माहिती सदर बाजार पोलिसांना देण्यात आली.सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासह इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनास्थळाला पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्यासह राज्य राखीव पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आला.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.