व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टीच्या भूमिपुञाचा चीनमध्ये डंका;आशिया स्पर्धेत अविनाश साबळेने सुवर्ण पदकावर कोरले नाव

आमदार सुरेश धस यांनी केले अविनाशचे अभिनंदन

0

click2ashti Update-चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील बीडच्या सुपुत्राने सुवर्णमय कामगिरी केली आहे. अविनाश साबळेने आशियाई स्पर्धेत इतिहास रचला.आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात गोल्डमेडल जिंकले.अविनाशच्या या यशामुळे भारतासाठी आणखी एका गोल्डमेडलची भर पडली आहे.
गेल्या महिन्यात बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये अविनाश हा ७ व्या क्रमांकावर राहिला होता. त्यामुळे त्या कामगिरीवर अविनाश साबळे देखील स्वत:खुश नव्हता. मात्र, अविनाशने यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नव्या उमेदीन सहभाग घेतला आणि आज सुवर्णपदाकवर अखेर नाव कोरलच.अविनाश साबळे यानं आजच्या स्पर्धेपूर्वी यंदाच्या हगांमातील हांगझोऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धा ही अखेरची स्पर्धा असल्याचं म्हटलं होतं.मी राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करण्यासाठी धावत नसून हांगझोऊ मधील स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचा मानस असल्याचं तो म्हणाला होता.मी आशियाई क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी धावणार आहे.यासाठी प्रशिक्षण घेतलं असून चांगली कामगिरी करुन सुवर्णपदकावर नाव कोरणार असा निर्धार त्याने केला होता.
अखेर अविनाशची स्वप्नपूर्ती झाली
अखेर अविनाश साबळेनं आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरण्याचं स्वप्न पूर्ण केले आहे. त्याने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. याशिवाय तो ५ हजार मीटर क्रीडा प्रकारात देखील प्रयत्न करणार आहे.३००० मीटर स्टीपलचेस मध्ये सुवर्णपदक पटकावण्याचा विश्वास अविनाश साबळे यानं स्पर्धेपूर्वी व्यक्त केला होता.तो त्यानं सत्यात उतरवला आहे.
अविनाश ने आष्टीचे नाव देशात कोरले-आ.धस
अविनाश साबळे महाराष्ट्रातील मूळचा बीड जिल्ह्यातील आष्टी तालूक्यातील मांडवा येथील आहे.वयाच्या सहाव्या वर्षापासून अविनाश धावण्याचा सराव करत आहे.१२ वी चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अविनाश भारतीय लष्कराच्या ५ महार रेजिमेंटमध्ये दाखल झाला होता.दरम्यान,आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आता चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.१२ सुवर्ण,११ रौप्य आणि १६ कांस्यपदकांसह भारताने आतापर्यंत ४४पदकं मिळवली असून आष्टीचे नाव देशांत झळकविले असल्याचे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी सांगत अविनाशचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.