व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा ह्याच उद्देशाने स्पर्धेचे आयोजन-शैलेश सहस्त्रबुद्धे

विद्यार्थ्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप

0

click2ashti update-शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेली कला त्यांना विविध स्पर्धेतून दाखविण्यात येते.याच उद्देशाने आम्ही आमदार सुरेश धस मिञमंडळाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करून,आज एका पेक्षा एक सरस कला पाहण्यास मिळाल्याने मनस्वी आनंद झाल्याचे प्रतिपादन उपनराध्यक्ष शैलेश सहस्ञबुद्दे यांनी केले.
आष्टी शहरातील आ.सुरेश धस मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त शालेय विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुध्दे यांच्या संकल्पनेतून स्वखर्चाने चित्रकला,निबंध,वक्तृत्व,रांगोळी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये शहरातील अनिषा ग्लोबल स्कूल,पिंपळेश्वर इंग्लिश स्कूल,फिनिक्स इंग्लिश स्कूल,गणेश विद्यालय,वसुंधरा विद्यालय या शाळेच्या सुमारे ५८२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.ज्यामध्ये ४२ विद्यार्थी विद्यार्थिनीना अनुक्रमे प्रथम,द्वितीय,तृतीय, उत्तेजनार्थ येण्याचा मान मिळवला.या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.तर सहभागी स्पर्धक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप आज मंगळवार दि.३ रोजी करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.या प्रसंगी उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुध्दे,पत्रकार अविशांत कुमकर,पत्रकार प्रविण पोकळे,व्यापारी सचिन रानडे,प्रितम बोगावत यांच्यासह आदि उपस्थित होते.यावेळी आ.सुरेश धस मित्र मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी मंडळाचे सदस्य नेहमी अग्रेसर असतात.अशाच पद्धतीने वेळोवेळी आपण जेव्हा जेव्हा अशा स्पर्धांचे आयोजन कराल त्या त्या वेळी आमचे सर्व विद्यार्थी आणि आमची शाळा हिरीरीने यामध्ये सहभागी होईल अशी शास्वती शहारातील प्रमुख शाळेच्या वतीने मुख्याध्यापक,शिक्षकांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.