एक दिवस अगोदर प्रसिध्दी करून पाणी येत नसते,हे चार टर्मच्या आमदारांना कळलं पाहिजे-आ.आजबे
आमदार बाळासाहेब आजबे यांचा पञकार परिषदेत आरोप
click2ashti update-उजनी धरणाचे ओव्हर फ्लोचे पाणी आता सिना तलावात येण्यास सुरूवात झाली असून,गेल्या चार वर्षापासून हे पाणि रूटींग प्रमाणे येतेच पण यावर्षी पाऊस सर्वञच उशीरा आल्याने धरणे भरण्यास वेळ लागला.तसेच सिना धरणात पाणि सोडण्या संदर्भात कुकडी कालवा समितीची बैठक दि.५ सप्टेंबर रोजीच पुणे येथे संपन्न झाली होती.मला वाटतं याची माहिती सर्व मतदार संघाला माहित होतीच पण पाणि सिना धरणात एक दिवस येण्या अगोदर फक्त प्रसिध्दी करून पाणि येत नसते,हे बहुतेक चार टर्मचे आमदार म्हणून मिरविणा-या आमदारांना कळालं पाहिजे असा पलटवार आमदार बाळासाहेब आजबे यांनी आ.सुरेश धस यांना लगावला आहे.
आष्टी येथे आमदार सुरेश धस यांनी पञकार परिषद घेऊन कुकडी धरणातून सिना धरणात पाणी येणार असल्याचे प्रसिध्दी केली होती.त्या प्रसिध्दी पञकाचा आमदार आजबे यांनी खरपूस समाचार घेत आमदार सुरेश धस यांच्यावर टिका केली.यावेळी पुढे बोलतांना आ.आजबे म्हणाले,कुकडी पाण्यासंदर्भात आपण गेल्या एक महिन्यापासून प्रयत्नशील असून याबाबत कुकडी कालवा समितीच्या बैठकीत पिण्याच्या पाण्यासाठी ओहर फ्लोचे पाणी सोडण्याबाबत मागणी केली असता समितीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व इतर सदस्यांनीही तात्काळ मंजुरी देऊन तीन ते चार दिवस पाणी सोडले होते.काही तांत्रिक अडचणी मुळे ते बंद झाले होते,संबंधित अधिकारी यांच्याशीही भेटून पाण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले होते व सीना धरणातून मेहेकरी धरणात पाणी सोडण्यासाठी संबंधीत यंत्रणा गेल्या एक महिन्यापासून काम करत आहे.मग नेमके पाणी येणार त्याच्या एक दिवस अगोदर आपण पत्र देऊन प्रसिध्दी करून पाणी येत नसते हे माञ चार टर्मच्या आमदारांना कळालं पाहिजे तसेच ५ सप्टेंबरलाच आपण संबंधित मंत्री व कालवा समितीचे अध्यक्ष ना.चंद्रकांत दादा पाटील यांना पत्र देऊन व स्वतः त्या बैठकीस पुणे येथे उपस्थित राहून कुकडीच्या पाण्यासंदर्भात मागणी केली होती.आष्टी तालुक्यावर दुष्काळाचे संकट घोंगावत आहे पुढील काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू नये म्हणून आत्ताच कुकडी धरणातून जाणारे वाहून जाणारे वेस्टेज पाणी हे सीना धरणात सोडावे व सीना धरणातून लगेच ते मेहकरी धरणात सोडण्यात यावे याबाबत सविस्तर चर्चा मंत्री महोदय व अधिकाऱ्यांची झाली होती.त्यामुळे तात्काळ दोन दिवसातच पुढे कुकडी धरणातून सिना धरणामध्ये पाणी सोडण्यात आले होते परंतु पावसाचे प्रमाण कमी झाल्याने व काही तांत्रिक अडचणीमुळे चे पाणी बंद झाले. त्यानंतर कुकडी चे तीन कालवे ओव्हरफ्लो झाल्याने ३० सप्टेंबर रोजी पाणी सोडण्याचे सुरू झाले परंतु त्याच्या एक दिवस अगोदरच आ.सुरेश धस महोदयांनी २९ तारखेला पाणी सोडण्यात यावे असे पत्र दिले २९ तारखेला सर्व विभागाला सुट्टी होती व ३० तारखेला लगेच पाणी सोडण्यात आले असे शक्य आहे का ?असा सवाल करून आपण अनुभवी नेते आहात स्टेटमेंट करताना तरी सर्व गोष्टी तपासून स्टेटमेंट केले.आपण कुकडीचे पाणी सोडण्यासंदर्भात संबंधित विभागाला पत्र दिले असले तरीही काही हरकत नाही चांगल्या कामात आम्ही कधीही आडकाठी आणत नाहीत परंतु पाणी सुटणार हे माहीत असताना आदल्या दिवशी पत्र देणे व आपण दिलेल्या पत्रामुळेच कुकडीचे पाणी सोडण्यात आले असे म्हणणे हे कितपत योग्य आहे ही जनतेची दिशा दिशाभूल नाही का?असा प्रश्न यावेळी आमदार बाळासाहेब आजबे यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.तर कुकडी पाण्यासंदर्भात आपण गेले एक महिन्यापासून पाठपुरावा करत आहोत त्या संबंधित सर्व पत्र व्यवहार व अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेचे रेकॉर्ड आपल्याकडे आहे परंतु मला जास्त खोलात जायचे नाही चांगल्या कामासाठी आपण कोणालाही आडवे येणार नाहीत त्यांनीही पत्र देऊन प्रयत्न केले असतील त्याबाबतही आमचं काही म्हणणं नाही त्याचबरोबर खुंटेफळ पाईपलाईन कामाबाबतचे टेंडर हे मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झालेले नसून या १३५७ कोटी रुपयांच्या कामाला अगोदर शासनाने मंजुरी दिल्यामुळे ते औरंगाबाद च्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीचा सवालच उद्भभवत नाही आपण औरंगाबादच्या बैठकीत मंजूर झाले असे म्हणलो नाही तर १३५७ कोटी रुपयांचे या कामाचे टेंडर लवकरच प्रसिद्ध होणार असल्याचे म्हटलं होतं १३५७ कोटी बरोबरच व उर्वरित ७०० कोटी रुपये हे मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झाले असल्याचे आपण म्हटलो होतो त्याबाबतही विपर्यास करण्यात आलेला आहे येत्या दहा ते पंधरा दिवसाच्या कालावधीत खुंटेफळ ते शिंपोरा थेट पाईपलाईनचे टेंडर प्रसिद्ध होईल त्याबाबतही आपण संबंधित मंत्री व अधिकारी यांच्याशी संपर्कात आहोत त्या बाबतही मतदारसंघातील सर्वच नेत्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.चांगल्या कामासाठी आपण एकत्र आले पाहिजे असे वारंवार आपण सर्वांनाच आवाहन करत आहे.परंतु चांगल्या कामासाठी एकत्र येणे ऐवजी आपण विरोधासाठी विरोध करणे योग्य नाही असे मत आमदार बाळासाहेब आजबे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.