व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

उद्या आष्टीत मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा;सकल मराठा समाजाकडून जय्यत तयारी

समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहा-सकल मराठा समाजाचे अवाहन

0

click2ashti update-शहरात सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांची विराट सभेचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक आष्टी येथे उद्या शुक्रवार दि.६ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता करण्यात आले असून सकल मराठा समाजाच्याकडून विराट सभेची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.या सभेस तालुक्यातील समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाबाबत पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्या सभेच्या रूपाने आरक्षणाची मशाल पेटणार आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसह इतर मागण्यांचे प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहेत. सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला चाळीस दिवसांचा वेळ संपत आलेला आहे.त्यामुळे मराठा समाजात पुन्हा एकदा आंदोलनाची धग पेटवण्यासाठी मनोज जरांगे यांची ही सभा अत्यंत महत्वाची ठरणार आहे.
जरांगे पाटील यांच्या सभेच्या तयारीसाठी सभेच्या नियोजनात येणाऱ्या अडचणी आणि करण्यात येणारी तयारी करण्यासाठी सकल मराठा समाजातील संयोजकाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.सभेच्या दिवशी येणाऱ्या लोकांसाठीची वाहनतळ व्यवस्था,पाणी व्यवस्था,बैठक व्यवस्था,व्यवस्थेसाठी १ हजार स्वयंसेवक यांची तयारी केली आहे.
तसेच मान्यवरांच्या बैठकीत व्यवस्था गटनिहाय गावोगावी सर्व मराठा युवक या सभेसाठी निमंत्रण देत आहेत.तर गावागावातुन या सभेसाठी देणगी देखील मोठया प्रमाणात जमा होत आहे.ही सभा शांततेत पार पाडण्याचे सकल मराठा समाज बांधवाच्यावतीने संयोजकांनी आवाहन केले असून या सभेसाठी महिला व पुरुषांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असेही आवाहन करण्यात आले आहे.
(बातमी स्ञोत-प्रविण पोकळे,पञकार आष्टी)

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.