व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

राजस्थान,मध्यप्रदेश,छत्तीसगड,तेलंगणा व मिझोरम राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचे बिगूल वाजले

पहा कधी होणार मतदान,कधी आहे निकाल

0

click2ashti update-राजस्थान,मध्य प्रदेश,छत्तीसगड,तेलंगणा आणि मिझोरम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे.याशिवाय मध्य प्रदेशात 17 नोव्हेंबर आणि राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
निवडणूक आयोगानुसार, एकाच टप्प्यात मिझोरममध्ये ७ नोव्हेंबरला आणि तेलंगणात ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पाचही राज्यांचे निकाल ३ डिसेंबरला लागणार आहेत.मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, या राज्यांमध्ये एकूण 16.14 कोटी मतदार आहेत. यामध्ये ८.२ कोटी पुरुष आणि ७.८ कोटी महिला मतदार असतील. यावेळी 60.2 लाख नवीन मतदार प्रथमच मतदान करणार आहेत.

असा होणार निवडणूक कार्यक्रम 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.