मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली येथील सभेसाठी आष्टीच्या युवकाची सायकल स्वारी;
मनोज जरांगे यांच्या अंदोलनाला सुरूवातीपासूनच पाठिंबा देणारा युवक
click2ashti update-मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही दिवसापासून लढा उभारला आहे.त्यांनी सलग 17 दिवस उपोषण करीत तीव्र आंदोलन छेडले.त्यानंतर सरकारला चाळीस दिवसाचा अल्टिमेट तिला असून अंतरवली येथे दिनांक 14 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाची भव्य दिव्य अशी सभा आयोजित केली आहे या सभेसाठी आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथील युवक अशोक पोकळे हा तब्बल 180 किलोमीटर अंतर पार करीत पार करणारा असून रविवारी दुपारच्या सुमारास तो अंतरवली जिल्हा जालना कडे सायकलवर रवाना झाला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे नियोजन करण्यासाठी अनेक ठिकाणी सभा घेत आहेत व दिनांक 14 ऑक्टोबर अंतरवली येथे होणाऱ्या सभेचे निमंत्रण देत आहेत. याच सभेसाठी आष्टी तालुक्यातील ध्येयवेढा तरुण अशोक पोकळे हे सायकलवर निघाले असून 180 किलोमीटरचा प्रवास व सहा मुक्काम असा दौरा करीत आष्टीवरून रविवारी निघाले आहेत.सोमवार दि.9 रोजी सायकलवर त्यांचा दुसरा दिवस असून पाथर्डी तालुक्यामध्ये त्यांचा आजचा मुक्काम आहे.त्यानंतर ते मजल दरमजल करत दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी अंतरवली येथे पोहोचणार असून मी सायकल वर जाऊ शकतो तुम्ही किमान चार चाकी गाडीत तरी यावे यासाठी मी सायकलवर जात असल्याचे अशोक पोकळे यांनी सांगितले.अशोक पोकळे हे सायकलवरून जाताना प्रत्येक गावामध्ये थांबून मराठा समाजाच्या युवकांना अंतरवली येथील सभेचे निमंत्रण देत आहेत.जरांगे पाटील ज्यावेळी अंतरवाली येथे उपोषणास बसले होते त्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी अशोक पोकळे यांनी त्यांच्या स्वतःच्या चिंचाळा या गावात सात दिवस आमरण उपोषण केले होते.