खुंटेफळ साठवण तलावासाठी केलेल्या कामाचे पुरावे दाखवा;मग जनता ठरविन कोण मूर्गा,कोण फकीर
आमदार धसांचा आमदार आजबेंवर पलटवार
click2ashti update-खुंटेफळ साठण तलावाचा शुंभारभ करण्यासाठी मला काय करावे लागले याची माझ्यासह संपूर्ण मतदार संघाला माहित आहे.आत्ता पर्यंत आपण या खुंटेफळ साठवण तलावासाठी आमदार महोदयांनी काय-काय प्रयत्न केले हे दाखवावे मी ही दाखवितो पुरावे पाहितल्यावर समजेल की कोण मुर्गा अन् कोण फकीर असे म्हणत आमदार आजबे यांनी केलेले आरोप आमदार सुरेश धस यांनी फेटाळून लावले आहेत.
आष्टी येथील औव्दैतचंद्र या निवासस्थानी दि.१० शुक्रवार सांय- ५ वा.आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत आमदार सुरेश धस बोलत होते.पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,दिवाळी नंतर खुंटेफळ साठवण तलावाची जी निविदा काढण्याची परवानगी मिळायची आहे.त्याची अघ्याप फाईलची झेराॅक्स प्राप्त झाली नाही परंतु दिवाळी सणा नंतर होईल.त्यानंतर या योजनेतला मुर्गा कोण? अन् फकीर कोण? हे स्पष्ट होईल.या योजनेची सुरूवात मी करत सर्वेक्षण केले आहे.तर आमदार बाळासाहेब आजबे यांनी या योजनेसाठी काय केले ते सांगावे असे बोलत आ.बाळासाहेब आजबे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.आमदार बाळासाहेब आजबे यांनी या योजनेसाठी किती कष्ट घेतले अन् किती मेहनत केली हे पञकारांसह जनतेला सांगावे आरोप करण्या आगोदर आपण या योजनेसाठी किती प्रयत्न केले.कुणा कुणाला भेटले हे सांगावे आणि पुरावे दाखवावे असे अवानही आ.धस यांनी आ.आजबे यांना केले आहे.
या ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत भारतीय जनता पार्टीने माजीमंञी पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लढवत पुढील प्रमाणे ग्रामपंचायत विजयी झालेल्या तालुकानिहाय आष्टी तालुका-सांगवी आष्टी-सरपंच व ४ सदस्य
धिर्डी सरपंच व सर्व सदस्य
पाटोदा तालुका-धनगर जवळका-सरपंच सर्व सदस्य
मुगगांव-सरपंच व ६ सदस्य,गांधनवाडी- सरपंच व ४ सदस्य, रोहतवाडी- फक्त ७ सदस्य,तांबाराजुरी-सरपंच
वडझरी-सरपंच व ७ सदस्य
शिरूर कासार तालुका-उखंडा चकला-सरपंच सर्व सदस्य,तिंतरवणी-सरपंच व ४ सदस्य,बोरगांव चकला फक्त-सरपंच,तरडगव्हाण-सरपंच व ७ सदस्य,पिंपळनेर -सरपंच सर्व सदस्य,घोगस पारगांव-फक्त ३ सदस्य
चुंबळी-फक्त ४ सदस्य अशा ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात आले असल्याचे आ.धस यांनी सांगीतले.