यंदाचा १७ वर्षाखालील राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या आयोजनाचा मान बीड जिल्ह्याला-आमदार सुरेश धस
आष्टीच्या अनिषा ग्लोबल शाळेच्या मैदानावर होणार स्पर्धा
click2ashti update- महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय संचालनालयातर्फे राज्यस्तरीय १७ वर्षाखालील राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या आयोजनाचा मान यावर्षी आष्टी तालुक्याला मिळाला आहे. २८ ते २९ नोव्हेंबर दरम्यान अनिषा ग्लोबल या शाळेच्या मैदानावर स्पर्धा होतील.अशी माहिती स्पर्धेचे आयोजक आमदार सुरेश धस यांनी दिली आहे.
आष्टी येथील औव्दैतचंद्र या निवासस्थानी शनिवार दि.२५ रोजी सांयकाळी साडेसहा वाजता आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत आ.धस बोलत होते.पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,१७ वर्षाखालील राज्य कबड्डी ची स्पर्धा २८ व २९ रोजी होणार आहे.
यामध्ये उद्याटक खा.प्रितम मुंडे,माजी आ.भिमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर यांच्यासह जिल्हा क्रिडाअधिकारी व विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे आमदार धस यांनी सांगितले.तसेच आष्टी तालुक्यासह जिल्ह्याला कबड्डीची चांगली परंपरा आहे.जिल्ह्यातील कबड्डीपट्टूंनी अनेक स्पर्धा गाजविल्या आहेत.या स्पर्धेनिमित्त आष्टी तालुक्यासह जिल्ह्याला आनंदाची पर्वणी मिळणार असल्याने या स्पर्धेच्या आयोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही,याची दक्षता घेण्यात येणार असून,या स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या सर्व समित्यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी.या १७ वर्षाखालील राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी राज्यातील छ.संभाजी नगर,कोल्हापूर,मुंबई,लातूर,आमवती,नागपूर,नाशिक,
पुणे,आठ विभागातील ८ मुलींचे ८ असे एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत.या संघामध्ये विविध राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत खेळलेल्या खेळाडूंचा समावेश आहे.प्रत्येक संघातील १२ खेळाडू, १ क्रीडा मार्गदर्शक, १ व्यवस्थापक, असा एकूण १४ जणांचा समावेश राहील. स्पर्धेत २२४ कबड्डीपट्टू सरपंच,पंच व पदाधिकारी,अधिकारी तसेच ५० स्वयंसेवक व समिती सदस्य असे सहभागी होणार आहेत.स्पर्धेसाठी आष्टी येथील पिंपळेश्वर देवस्थान संचलित अनिशा ग्लोबल या शाळेच्या मैदानावर होणार असून दोन मॅटचे कबड्डीचे मैदान तयार करण्यात येणार आहेत.या स्पर्धेची जयत्त तयारी सुरू असल्याची माहिती आ.सुरेश धस यांनी दिली.