विवाहितीच्या आत्महत्येला वेगळी कलाटणी; पतीसह,सासू,सासरा,दिरावर गुन्हा दाखल
धामणगांव येथील प्रकार
click2ashti update-रागाच्या भरात घरातून बायको निघून गेल्याची तक्रार अंभोरा पोलिसांत नवराने दिली होती.त्यानंतर दोन दिवसांनीच बायकोचा मृत्यूदेह स्वता;च्या विहीरीत सापडला पण हि आत्महत्या केली नसून,सासरच्या मंडळीने माझ्या मुलीचा छळ करून तिला संपवून टाकल्याचा आरोप मयत महिलेच्या आईने करत पतीसह सासू,सासरा व दिर असा चौघांवर अंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून,या प्रकरणामुळे विवाहीतेच्या आत्महत्येला वेगळीच कलाटणी मिळाली असल्याने आता पोलिसांनी आपला खाकी बाणा दाखविल्यानंतरच सत्य समोर येईल.
याप्रकरणी अधिक माहिती अशी,आष्टी तालुक्यातील साबलखेड माहेर असलेल्या कोमल हिचा काही वर्षापुर्वी धामणगांव येथील श्रीकांत कल्याण राऊत याच्याशी विवाह झाला होता.सुरवातीचे काही वर्ष सुखी संसार सुरू होता.पण नंतर सासरकडील मंडळी तिला त्रास देत असल्याने ती २६ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या दरम्यान सगळे झोपेत असताना घराला बाहेरून कडी लावून बेपत्ता झाली होती.बेपत्ता झाल्याची तशी नोंद पती श्रीकांत कल्याण राऊत यांनी २७ नोव्हेंबर रोजी अंभोरा पोलिस ठाण्यात दिली होती.२९ नोव्हेंबर रोजी बुधवारी सकाळी स्वताच्या विहीरीत महिलेचा मृतदेह विहीरीत आढळून आल्याने खळबळ उडाली होती.परंतु कोमलने आत्महत्या केली नसून तिचा सासरच्यांनी छळ करून हात्या केल्याचा आरोप मयतांच्या आईने मयतचे पती श्रीकांत कल्याण राऊत,सासरा कल्याण विठ्ठल राऊत,सासू आशाबाई कल्याण राऊत,दिर निलेश कल्याण राऊत यां चौघांवर अंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून,वरील चार पैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून सासू आशाबाई राऊत माञ फरार असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्ष रवि देशमाने यांनी दिली आहे.