व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

पोलिसांना गुंगारा देणारी सासू अखेर पोलिसांच्या ताब्यात;धामणगांव येथे केली अटक

विवाहीतेच्या आत्महत्या प्रकरणी फरार अरोपी अटक

0

click2ashti update-सासरच्या लोकाच्या जाचाला कंटाळून बेपत्ता झालेल्या २५ वर्षीय विवाहितेचा मृतदेह घराजवळील विहीरीत आढळून आल्यानंतर अंभोरा पोलिस ठाण्यात सासरा,पती,सासू, दीर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.पण सासू फरार झाली होती.घटना घडल्यापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सासूला शनिवारी सकाळी अकराच्या दरम्यान धामणगांव येथून अटक केली आहे. आशाबाई कल्याण राऊत वय वर्ष ४० असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील साबलखेड येथील माहेर असलेल्या कोमल हिचा धामणगांव येथील श्रीकांत कल्याण राऊत याच्याशी विवाह झाला होता.काही वर्ष संसार सुखाचा चालला असताना कोमलला पती,सासरा,साहू,दीर मानसिक त्रास देऊन तिचा छळ करत होते.तिला हा प्रकार सहन न झाल्याने २६ नोव्हेंबर रोजी ती बेपत्ता झाली होती.२९ नोव्हेंबर रोजी तिचा मृतदेह घरालगत असलेल्या स्वताच्या विहीरीत आढळून आल्यानंतर मयत कोमलची आई लक्ष्मी जयराम गायकवाड याच्या फिर्यादीवरून पती श्रीकांत कल्याण राऊत, सासरा कल्याण विठ्ठल राऊत, सासू आशाबाई कल्याण राऊत, दीर निलेश कल्याण राऊत याच्या विरोधात अंभोरा पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. अंभोरा पोलिसांनी सासरा,पती,दीर यांना राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली. असुन सासू घटना घडल्या पासून पोलिसांना गुंगरा देत फरार होती. शनिवारी सकाळी अखेर तिला धामणगांव येथून अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कामगिरी अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे,पोलिस उपनिरीक्षक रवि देशमाने, पोलीस अंमलदार शिवदास केदार, सुदाम पोकळे पोलिस नाईक सुवर्णा पालवे यांनी केली.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवि देशमाने करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.