व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

हिवाळी अधिवेशाच्या पहिल्याच दिवशी आमदार धसांनी मतदार संघात आणले ३१ कोटी चे रस्ते

राज्याचे मुख्यमंञी,उपमुख्यमंञी यांचे मानले आभार

0

click2ashti update-विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार सुरेश धस यांनी आष्टी मतदार संघातील रस्त्यांसाठी सुमारे ३१ कोटी रूपायांचा निधी मंजूर करून घेतला आहे.या रस्त्यांमुळे मतदार संघातील दळणवळणाला गती मिळणार आहे.आमदार धसांनी आणलेल्या कामांना नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

नागपूर येथे सुरू असलेल्या पुरवणी अर्थसंकल्प बजेट मध्ये आष्टी मतदारसंघात एकुण३१ कोटी रुपयांच्या रस्ते कामांना मंजुरी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब, मा.रविंद्र चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचे विशेष आभार आमदार धस यांनी मानले आहेत.पुढील प्रमाणे मंजूर झालेले कामे व निधी
कोयाळ ते खुंटेफळ वाटेफळ रस्ता- ५ कोटी,लोणी ते कुंटेफळ वाटेफळ रस्ता-५ कोटी,पुंडी ते शिरापूर रस्ता- ३ कोटी,बेळगाव ते मांडवा रस्ता- ३ कोटी,वाघळूज ते गटकळ वस्ती रस्ता- १.५ कोटी,मेहकरी ते पिंपळगाव दाणी रस्ता- १.५ कोटी,पिंपळा ते सुंबेवाडी रस्ता- १.५ कोटी,जामगांव ते दत्ता मंदिर रस्ता- २ कोटी,आष्टी सोलेवाडी रस्त्यावरील पुल बांधकाम करणे- २.५ कोटी,प्रजिमा-१९ ते ब्राम्हणवाडी रस्ता – २ कोटी,दासखेड ते माळेवाडी रस्ता- २.५ कोटी,वडाळी ते मद्मापुरी रस्ता -१.५ कोटी असे कामे मंजूर झाले असून एकूण आष्टी मतदार संघातील रस्त्यांसाठी पहिल्याच दिवशी आमदार धसांनी दमदार काम करत ३१ कोटीचा निधी मंजूरू करून आणल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.