भाव भावाच्या मारहाणीत जखमी झालेल्या मोठ्या भावाचा उपचारादरम्यान मृत्यू
आष्टी तालुक्यातील वाघळूंज येथील घटना
click2ashti update- सिमेवर सेवा बजावत असलेला मोठा भाऊ मागील काही दिवसांपासून सुट्टीवर गावी आला होता.शुक्रवारी रात्री दोघाभावात वाद झाल्याने यात जखमी झालेल्या भावाचा मारहाणीत अहमदनगर येथे उपचारादरम्यान दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.प्रवीण विनायक पवार असे मयताचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील वाघळुज येथील चौकी तांड्यावरील प्रवीण हा आर्मी मध्ये नोकरीला असून तो मागील काही दिवसांपासून सुट्टीवर गावी आला होता. ८ डिसेंबर रोजी दोघा भावात मारामारी झाली.या मारहाणीत प्रवीण याला मार लागल्याने त्याला अहमदनगर येथील रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.पण शनिवारी पहाटे चारच्या दरम्यान त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळताच अंभोरा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.तपास अंभोरा पोलिस करीत आहेत.मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून सासु झुंबरबाई पवार,सासरे विनायक पवार, सून सोनाली पवार,भाऊ विनोद पवार याच्या विरोधात अंभोरा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास उपनिरीक्षक आदिनाथ भडके करीतआहेत.