व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

जातवैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर करा:सदस्यत्व रद्दची कार्यवाही करणार-तहसिलदार प्रमोद गायकवाड

0

click2ashti update-मागील वर्षी निवडणूक झालेल्या तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांनी त्यांचे जातवैधता प्रमाणपत्र १७ डिसेंबरच्या आत सादर करावे. मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास नियमानुसार निवड रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन तहसीलदार प्रमोद गायकवाड यांनी केले आहे.

ग्रामपंचायत निवडणूक २०२२ मध्ये आष्टी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) या प्रवर्गातून निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांना जातवैधता प्रमाणपत्र एक वर्षाच्या आत सादर करणे बंधनकारक असल्याचे सूचित केलेले होते.तसे बंधपत्र लेखी सादर करण्यात आले होते.आता ग्रामपंचायत निवडणुकीला येत्या १७ डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्यांनी आपले जातवैधता प्रमाणपत्र निवडणूक विभागात सादर करावे. या प्रवर्गातील जे सरपंच, सदस्य जातवैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर करणार नाहीत, त्यांची सदस्यत्व रद्दची प्रक्रिया सुरू करून तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल. त्यामुळे कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी संबंधित प्रवर्गातील सरपंच, सदस्यांनी आपले जातवैधता प्रमाणपत्र १७ डिसेंबरपर्यंत निवडणूक विभागात सादर करावे, असे आवाहन तहसीलदार प्रमोद गायकवाड यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.
WhatsApp Group