व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मा.आ.भीमराव धोंडे यांच्या हस्ते संपन्न

कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे,मा.मंत्री पंकजा मुंडे,यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार उद्याटन

0

click2ashti update-हरित क्रांतीचे जनक डाॅ.स्वामीनाथन म्हणायचे की गहू एकरी २०० क्विंटल झाला पाहिजे तरच वाढत्या लोकसंख्येनुसार धान्य पुरेल.भारतामध्ये ८० कोटी लोकांना केंद्र सरकार मोफत धान्य देत आहे.भविष्यात हे सर्वांना पुरेल यासाठी उत्पन्न वाढविण्याची गरज आहे.आपल्याकडे हेक्टरी २० क्विंटल कापूस निघतो तर चिनमध्ये ७० क्विंटल निघतो.जगाच्या बरोबर आपली शेती कशी पिकेल याचा विचार करून प्रयत्न केला पाहिजे.चिन व आपल्या हवामानात जास्त बदल नाही परंतु त्यांचे उत्पन्न दुप्पट आहे.आपल्याला संशोधन करण्याची गरज आहे.यासाठी आपण कृषी विषेयक कार्यक्रमांमध्ये गेले पाहिजे म्हणूनच आष्टीत आपण कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे‌.यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा यासाठी गावोगावी प्रचार करणार असल्याचे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे मुख्य संयोजक तथा माजी आ.भीमराव धोंडे यांनी सांगीतले.
आष्टी येथे मा.आमदार भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतुन व छत्रपती शाहू फुले आंबेडकर कृषी महाविद्यालय,आष्टी च्या वतीने २४ ते २७ डिसेंबर २०२३ दरम्यान होणाऱ्या ४ दिवसीय डॉ स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या संपर्क कार्यालयाचे उद्याटन रविवार दि.१० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता संपन्न झाले.यावेळी ते बोलत होते.पुढे बोलतांना ते म्हणाले,या कृषी प्रदर्शनाचे उद्याटन राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे,मा.मंत्री पंकजा मुंडे,कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल , मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, पद्मभूषण पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे असे धोंडे सांगितले.तसेच या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात दीडशे ते दोनशे कृषिविषयक दुकानंसह खाऊ गल्लीची दुकाने सहभागी होणार असून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञाना ची माहिती मिळणार आहे.या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्पादकांना थेट ग्राहकापर्यंत पोहोचवत अल्प दरात आपली उत्पादने व सेवा लाखो ग्राहकापर्यंत पोचवता येणार आहे. शेतकरी बांधवाना ही अगदी मोफत या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा.
या कृषी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण दोन कोटी किमंतीचा दीड टन वजनाचा रेडा असणार आहे.या प्रदर्शनात डेअरी तंत्रज्ञान,कृषी तंत्रज्ञान,सोलर, शासकीय योजना,शेती अवजारे,बी-बियाणे,कुक्कुटपालन खते,सिंचन, पतपुरवठा,हरितगृह,खाऊ गल्ली,लहानांसाठी खेळ गल्ली यासह विविध कृषी पिकासंदर्भात तज्ञ मार्गदर्शक तज्ञ मार्गदर्शन करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.या संपर्क कार्यालयाच्या उद्याटनावेळी विठ्ठल बनसोडे,नगरसेवक दादासाहेब गर्जे, अॅड.रत्नदिप निकाळजे,शंकर देशमुख,पत्रकार उत्तम बोडखे,आस्ताक शेख,भाजपा तालुका उपाध्यक्ष रघुनाथ शिंदे,बाबुराव कदम,प्राचार्य श्रीराम आरसुळ,बाजीराव वाल्हेकर,बंडू पाचपुते,गणेश जठार,नितीन निकाळजे,युवराज ससाणे,अनिल साळवे,सनी काळपुंड महाविद्यालयीन कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.