शहरातील अतिक्रमाणाचा फुगारा,नगर पंचायतने काढला;आष्टी नगर पंचायतची धडक कारवाई
नागरीकांनी केले नगर पंचायतचे कौतुक
click2ashti update-शहरातील मुख्य चौकात रस्त्यालगत, दुकानदारांनी आप-आपल्या दुकानांसमोर थाटलेला अतिक्रमणाचा फुगारा आष्टी नगर पंचायतने हाटवल्याने शहराने मोकळा श्वास घेतला आहे.या कारवाईमुळे नगर पंचायतचे कौतुक होत आहे.
आष्टी शहरातील अतिक्रमणे मागील काहि दिवसापूर्वी नगर पंचायतने हाटविले होते.यामुळे शहरातील रस्ते चांगल्या पध्दतीने करण्यात आले.परंतु याच दुकानदारांनी पुन्हा आपल्या दारात असलेल्या नगर पंचायतने केलेल्या नालीच्या पुढे येत ओटे,सावलिसाठी निवारा शेड उभारण्यात आले होते.यामुळे रस्तावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.नगर पंचायतच्या वतीने वारांवार या अतिक्रमण धारकांना तोंडी सुचना देऊनही शुक्रवार दि.१५ रोजी दुपारी २ च्या सुमारास नगर पंचायतने पोलिस बंदोबस्तात कारवाई करत अतिक्रमाणाचा फुगारा काढला आहे.या काढलेल्या अतिक्रमाणे शहरातील वाहतुक सुरूळीत होऊन नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.या कारवाईच्या वेळेस नगर पंचायतचे नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष,सर्व नगरसेवक,नगर पंचायतचे मुख्यअधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्यापा-यांनी सहकार्य करावे-नगराध्यक्ष बेग
शहरातील मुख्य बाजार पेठेत असलेल्या दुकानदारांनी आपल्या दुकानासमोरच वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे म्हणजे सावलीसाठी सेड उभारणे,दुकानाचा बोर्ड दारात लावणे असे काहिही कृत न करता आपण आपल्या दुकानासमोर आपल्या व ग्राहकाची वाहने लागतील अशी जागा मोकळी ठेवावी जेणे करून नगर पंचायतला अशी कारवाई करण्याची वेळ येणार नाही.
-जिया बेग,नगराध्यक्ष न.प.आष्टी
सांगूनही न ऐकल्यामुळे कारवाई-मुख्यअधिकारी मोरे
याबाबत आम्ही नगर पंचायतच्या माध्यमातून तोंडी,सुचना देऊन यावर न ऐकल्यामुळे स्वत;पदाधिकारी व कर्मचारी यांनी दुकानदारांना जाऊन सांगितले.परंतु याकडे सर्व अतिक्रमण धारकांने दुर्लेक्ष केल्याने हि कारवाई करण्यात आली.असे नगर पंचायतचे मुख्यअधिकारी बाळदत्त मोरे यांनी माध्यमाशी बोलतांना सांगितले.