स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर;विरोधकांचा जोर वसरला..!
१ जानेवारीला होणार चिञ स्पष्ट
click2ashti update-आष्टी तालुक्यातील शिक्षकांची प्रतिष्ठीत समजली जाणारी स्वामी विवेकानंद सहकारी शिक्षक पतसंस्थेची निवडणूक जाहिर झाली असून,या निवडणूकीत १७ जागेसाठी ११३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.परंतु अर्ज माघार घेण्यासाठी १५ दिवसाचा अवधी असल्याने या निवडणूकीचे वातावरण ओसारले असून,सत्ताधारी यांनी हि निवडणूक बिनविरोध करण्याची तयारी केली तर विरोधकांनी आपली धार कमी केल्याचे सध्यातरी चिञ दिसत आहे.त्यामुळे हि निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर दिसत आहे.