गोचिडा सारखे चिकटून असलेल्या प्रस्थापितांना या निवडणूकीत थारा नाही-बाळासाहेब महाडीक
स्वामी विवेकानंद निवणूकीसाठी आम्ही सज्ज
click2ashti update-गेल्या अनेक वर्षापासून गोचिडा सारखे चिकटून असलेल्या प्रस्तापितांना यावर्षी थारा नसून,स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्थेच्या निवडणूकीत परिवर्तन होणारच असल्याचा निर्धार शिक्षकांनीच केला आहे.त्यामुळे आता परिवर्तनाचे वारे असल्याचे प्रतिपादन शिक्षक एकता पॅनलचे बाळासाहेब महाडिक यांनी केले आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून तालुक्यातील शिक्षकांची मनाची समजली जाणारी अर्थवाहिनी असलेली स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे.आता दि.१ जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज माघार घेण्याची सुरूवात आहे.एकूण १७ जागेसाठी ११३ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले.या निवडणुकीत आता शिक्षक एकता पॅनलने कंबर खसली आहे.गेल्या अनेक वर्षापासून गोचीडा सारखे चिकटून असलेल्या प्रस्तापितांना या निवडणूकीत घरचा रस्ता दाखविण्यासाठी मतदारांनी निर्धार केला आहे.आता या निवडणूकीत शिक्षक एकता पॅनलचे सर्व उमेदवार विजयी होणार असल्याचे प्रतिपादन एकता पॅनलचे बाळासाहेब महाडिक यांनी केले आहे.