व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

जास्तीचा मोबदला मिळण्यासाठी त्याने चक्क कोर्टाचा निकालच बदलला…!

बीड जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस

0

click2ashti update-मावेजाच्या प्रकरणात २०१६
साली बीडच्या न्यायालयाने निर्णय दिला.परंतु नंतर यातील सहा पानेच बदलण्यात आली.हा प्रकार २०१६ ते २०२२ या काळात घडला.सहायक सरकारी वकील यांना समजताच त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला.त्यानंतर न्यायालयाच्या वतीने कार्यालयीन अधीक्षकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.चक्क न्यायालयाचा निकालच बदलल्याने खळबळ उडाली आहे.

गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील पाझर तलावाच्या संपादित जमिनीचा तक्रारदाराला भूसंपादन अधिकाऱ्यांनी मावेजा मंजूर केला होता.नुकसान भरपाईच्या नाराजीने वाढीव मावेजा मिळावा, यासाठी पाच प्रकरणे दाखल करण्यात आली होती.त्यानुसार २ जुलै २०१६ रोजी तत्कालीन सहदिवाणी न्या.व स्तर न्या.साजिद आरेफ सय्यद यांनी ही प्रकरणे निकाली काढली.न्यायालयाच्या निकालात फेरफार करणे ही अतिशय गंभीर बाब आहे.सामान्य व्यक्ती अशी हिंमत करू शकत नाही.यात न्यायालयातीलच काही व्यक्तींचा समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यानुसार आता पोलिस तपास करत आहेत.हा निकाल बदलण्यासाठी आर्थिक उलाढाल झाल्याचीही शक्यता असू शकते.न्यायालयाचे अधीक्षक नरेंद्र पाठक यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय दंड संहिता १८६० अधिनियमचे कलम ३४,४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ नुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल गुरले करत आहेत.
यामुळे झाला उलगडा
निकालाच्या प्रतीचा कागद हा जाड असतो.यामध्ये वाढीव मावेजाची रक्कमही लिहिण्यात आली होती. परंतु,नंतर सहायक सरकारी वकिलांनी या प्रकरणातील प्रमाणित प्रतींची मागणी केली.त्यानंतर या निर्णयातील पान क्रमाक ९, १०, १७, १९, २० व २५ हे बदलल्याचे दिसले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.