शुक्रवारी आष्टी ते अंमळनेर या रेल्वे मार्गावर होणार हायस्पीड चाचणी
या लोहमार्गावर नागरिकांनी थांबु नये,मध्यरेल्वे प्रशासनाकडून आवाहन
click2ashti update-गेली अनेक वर्षापासून असलेली प्रतिक्षा तसेच जिल्हा वासियांचा जिव्हाळ्याचा प्रश्न बीड नगर परळी रेल्वेचे आष्टी ते अंमळनेर मार्गावरील तीस किलोमीटरचे काम पुर्ण झाले असुन शुक्रवार दि.५ रोजी दुपारी तीन ते सहा व वेळेत तशी ११० किमी वेगाने हायस्पीड चाचणी होणार असल्याने या लोहमार्गावर नागरिकांनी थांबु नये असे आवाहन मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले असुन प्रशासन पातळीवर सुचना करण्यात आल्या आहेत.
बीड नगर परळी या मार्गावरील नगर ते आष्टी रेल्वे मागील वर्षे सुरू झाली त्यानंतर पुढील टप्पा आता आष्टी ते विघनवाडी हा देखील पूर्णत्वाकडे गेला आहे.शुक्रवार दि.५ रोजी आष्टी ते अंमळनेर या तीस किलोमीटर मार्गावर 110 किलोमीटर प्रति तास या वेगाने हायस्पीड चाचणी होणार आहे तसेच अहमदनगर ते न्यू आष्टी या ६६ किलोमीटर अंतरावर विद्युतीकरणाचे हे काम पूर्ण झाले आहे.
गुरुवारी रेल्वेगाडी हायस्पीड धावणार असल्याने प्रशासनाला तश्या मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सुचना करण्यात आल्या असून या मार्गावर लोंकानी मध्ये थांबु नये,आपली जनावरं बांधु नयेत, आपल्या जिवाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले असुन तश्या सुचना उप मुख्य अभियंता निर्माण मध्य रेल्वे अहमदनगर च्या अधिकाऱ्यांनी दिल्या असुन तसे आदेश जिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षक,उपविभागीय अधिकारी, पोलीस ठाणे आष्टी,अंभोरा यांना देण्यात आल्या आहेत.