आष्टी तालुका पत्रकार संघातर्फे मेहेर,बेग, पोकळे,आळकुटे,कांबळे,गोरे यांचा दर्पणदिनानिमित्त होणार सन्मान
अध्यक्ष विनोद ढोबळे यांनी दिली माहिती
click2ashti update-यावर्षीपासून पहिल्यांदाच आष्टी तालुका पत्रकार संघाचेवतीने व्यापारी,राजकीय व सामाजिक,प्रशासकीय सेवा आदि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला घेतला आहे.दर्पण दिनानिमित्त या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.डाॕ.विनोद ढोबळे यांनी दिली.
नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या आष्टी तालुका पत्रकार संघाने या दर्पण दिनानिमित्त तालुक्यात व्यापारी,सामाजिक,राजकीय,प्रशासकीय सेवा,कर्मचारी या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.शनिवार दि.६ जानेवारी रोजी सकाळी आष्टी तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांनी शहरातील पत्रकार भवनात विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल संतोषशेठ मेहेर(व्यापार),नगराध्यक्ष जिया बेग (सामाजिक),पंडीत पोकळे (युवा सरपंच),नितीन आळकुटे (पक्षीमित्र),अरुण कांबळे (प्रशासकीय सेवा),शिवाजी गोरे (उत्कृष्ट कर्मचारी) या सहा जणांना आदर्श पुरस्काराने सन्मानीत करण्यात येत आहे.या कार्यक्रमास शहरातील व्यापारी, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आष्टी तालुका पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आले आहे.अध्यक्ष विनोद ढोबळे,उपाध्यक्ष शरद रेडेकर,प्रविण पोकळे,सचिव गणेश दळवी तसेच सन्मानीय सदस्य प्रफुल्ल सहस्रबुद्दे,उत्तमराव बोडखे,शरद तळेकर,रघुनाथ कर्डिले,भीमराव गुरव, संतोष सानप,सचिन रानडे,मनोज पोकळे यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.