आष्टी तालुका पञकार संघाच्या अध्यक्षपदी प्रविण पोकळे तर उपाध्यक्ष पदी संतोष सानप यांची निवड
आष्टी येथील पञकार भवनात बैठक संपन्न
click2ashti-आष्टी तालुका पञकार संघाची नुकतीच बैठक जेष्ठ पञकार प्रफुल्ल सहस्ञबुद्दे,उत्तम बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.यावेळी सर्वानुमते तालुकाध्यक्षपदी प्रविण पोकळे यांची तर उपाध्यक्षपदी संतोष सानप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
आष्टी तालुका पञकार संघाची आष्टी येथे दर्पणदिनानिमित्त दि.६ रोजी दुपारी ४ वाजता पञकार भवन येथे संपन्न झाली.या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली.ही बैठक जेष्ठ पञकार प्रफुल्ल सहस्ञबुद्दे,उत्तम बोडखे,रघूनाथ कर्डिले,भीमराव गुरव,प्रा.डाॅ.विनोद ढोबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.या बैठकीत सर्वानुमते पञकार संघाच्या अध्यक्षपदी प्रविण पोकळे,उपाध्यक्षपदी संतोष सानप,सचिवपदी शरद रेडेकर यांची निवड करण्यात आली.या बैठकीस शरद तळेकर,गणेश दळवी,सचिन रानडे,मनोज पोकळे,यांच्यासह आदि पञकार उपस्थित होते.