समाजासाठी योगदान असणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव हे पत्रकारांचे कर्तव्यच-ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे
आष्टी दर्पणदिनानिमित्त सहा समाजरत्नाचा सन्मान संपन्न
click2ashti update-पत्रकार हा समाजाचा आरसा असतो त्याच्या लेखणीतून समाजातील घडामोडींचे प्रतिबिंब उमटत असते.समाजातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून अपप्रवृत्तींवर प्रहार असतानाच समाजासाठी आपापल्या क्षेत्रात भरीव योगदान असणाऱ्या आदर्श गुणवंत व्यक्तींचा सन्मान करणे हे देखील पत्रकारांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे यांनी केले.
आष्टी येथील आष्टी तालुका पत्रकार संघातर्फे दर्पण दिनानिमित्त आष्टीतील शहरातील पत्रकार भवनात विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल दि.६ जानेवारी शनिवारी संतोषशेठ मेहेर(व्यापार),नगराध्यक्ष जिया बेग (सामाजिक),पंडीत पोकळे(युवा सरपंच),नितीन आळकुटे (पक्षीमित्र),अरुण कांबळे(प्रशासकीय सेवा),शिवाजी गोरे
(उत्कृष्ट कर्मचारी) या सहा जणांना आदर्श पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.या सन्मान सोहळ्यामध्ये मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.यावेळी आष्टी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.विनोद ढोबळे,ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,अॅड.सीताराम पोकळे,रघुनाथ कर्डीले,शरद तळेकर,शरद रेडेकर,गणेश दळवी,सचिन रानडे,प्रवीण पोकळे,मनोज पोकळे आष्टी तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य, उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे,नगरसेवक किशोर झरेकर,सभापती शरीफ शेख आदि मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना सहस्त्रबुद्धे म्हणाले,आष्टी तालुक्यातील पत्रकारांनी नेहमीच संयमी पत्रकारिता केली आहे.केवळ समाजातील दोष दाखवण्याचेच काम केले असे नव्हे तर समाजामध्ये सकारात्मक पद्धतीने ऊर्जा निर्मिती करण्याचे काम केले आहे.या शोधक वृत्तीमुळेच आष्टी तालुका पत्रकार संघाचे सदस्यांनी आष्टीतील समाजासाठी भरीव योगदान असणाऱ्या व्यापारी क्षेत्रातील मेहर ज्वेलर्सचे विजयशेठ मेहेर यांनी आष्टीच्या बाजारपेठेची मान उंचावली आहे.नगरपंचायतीचे नगराध्यक्ष जिया बेग यांनी अनेक विकासाची कामे दर्जेदार पद्धतीने केल्यामुळे आष्टी शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे.अरुण कांबळे या पोलीस उपनिरीक्षकांनी आपली संपूर्ण सेवा अत्यंत प्रामाणिकपणे निष्कलंकपणे बजावली.आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथील युवा सरपंच असलेल्या पंडित पोकळे यांनी राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असतानाच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम केले आहे.आष्टी येथील महावितरण उपविभागात काम करणारे वरिष्ठ तंत्रज्ञ शिवाजी गोरे हे अत्यंत तळमळीने काम करणारे कर्मचारी असून अहोरात्र ते जनतेच्या सेवेत असतात. याचबरोबर नीतीन आळकुटे हा तरुण पशु पक्षांना जीवदान देण्याचे काम करत असून दुष्काळी पाणीटंचाई काळामध्ये स्वखर्चाने पशु पक्षांसाठी स्वखर्चाने चार ठिकाणी पाणवठे तयार करून त्यांची तहान भागवण्याचे पुण्यकर्म करत आहे.अशा या समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार आणि सन्मान आष्टी तालुका पत्रकार संघाच्यावतीने होत आहे.हे पत्रकारांचे कर्तव्यच आहे असे सांगितले.यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी समाजातील चांगले कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या सत्काराचे कल्पना आणि अशा प्रकारच्या व्यक्तींची निवड ही अत्यंत अल्पकाळात करण्यात आली असून अत्यंत योग्य व्यक्तींचा आज सन्मान होत आहे असे सांगितले सत्काराला उत्तर देताना विजयशेठ मेहेर यांनी आष्टीतील पत्रकार हे सव्यसाची असल्याचे सांगत आष्टीचे पत्रकार ज्ञानाचे बादशाहा आहेत असे सांगितले.यावेळी युवा सरपंच पंडित पोकळे यांनी या पुरस्कारामुळे आपली जबाबदारी वाढली असल्याचे सांगितले.अरुण कांबळे यावेळी बोलताना म्हणाले की,जे चूक आहे त्याला चूक आहे असे सांगण्याचे प्रामाणिकता ठेवली पाहिजे असे सांगितले.प्रास्ताविक करताना पत्रकार शरद तळेकर यांनी प्रसंगाची या सन्मान सोहळ्याची पार्श्वभूमी विशद केली.यावेळी उत्तमराव बोडखे,जिया बेग,संतोष सानप,शरद तळेकर,अध्यक्ष विनोद ढोबळे यांची भाषणे झाली.अध्यक्षीय समारोप व आभार विनोद ढोबळे यांनी मानले.संचलन शरद तळेकर यांनी केले.