व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आ.सुरेश धस यांच्या हस्ते होणार,पाणीपुरवठा योजना लोकार्पण आणि रस्ते कामांचे भूमिपूजन सोहळा !

गुरूवारी सकाळी होणार लोकार्पण

0

click2ashti update-आष्टी विधानसभा मतदार संघातील विकासाचा ध्यास घेतलेले विकासाभिमुख नेतृत्व आ.सुरेश धस यांच्या अथक प्रयत्नामुळे मंजूर झालेल्या टाकळसिंग येथील पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण आणि टाकळसिंग – हनुमंतगाव – शिराळ तसेच राज्यमार्ग क्र.७० आष्टी-खडकत रस्ता ते चिखली या दोन रस्ता कामांचा भूमिपूजन समारंभ आज गुरुवार दि.११ जानेवारी रोजी होत असून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पंचायत समिती सभापती बद्रीनाथ जगताप आणि युवा नेते गणेश नाना शिंदे यांनी केले आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त असे की,टाकळसिंग – हनुमंत गाव ते शिराळ ५ कोटी ४३लाख रु. किंमतीच्या रस्ता कामाचे भूमिपूजन आणि टाकळ सिंग येथील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावी यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत ४ कोटी ९१ लक्ष रु. किमतीची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झालेली असून या योजनेचा लोकार्पण सोहळा आ. सुरेश धस यांच्या हस्ते होणार असून मारुती मंदिर टाकळसिंग या ठिकाणी सकाळी ८.३० साडेआठ वा.आणि चिखलीकर जनतेची गेल्या अनेक दिवसापासून ची आग्रही मागणी असलेला राज्यमार्ग क्र.७० आष्टी-खडकत रोड ते चिखली या गावापर्यंतचा १ कोटी ६८ लक्ष रु.किमतीचा रस्ता कामाचा भूमिपूजन समारंभ चिखली या ठिकाणी सकाळी ९.३० वा.आयोजित करण्यात आलेला आहे.एकूण १२ कोटी २ लक्ष रुपयांच्या विविध विकास रस्ता कामाचा भूमिपूजन समारंभ होणार असल्याची माहिती सा.बा.विभागाचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी दिली.गेल्या अनेक दिवसापासून च्या मागणी होत असलेल्या या टाकळसिंग आणि चिखली येथील ग्रामस्थांच्या मागणीला अखेर यश प्राप्त झाले असून जनतेच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आ. सुरेश धस यांनी या कामी अथक प्रयत्न केल्यामुळे पाणीपुरवठा योजना आणि आवश्यक असलेल्या रस्त्यांची असलेली विकास कामे मार्गी लागत आहेत त्यामुळे चिखली परिसरातील नागरिकांनी चिखली येथे आणि टाकळ सिंग परिसरातील नागरिकांनी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पंचायत समितीचे माजी सभापती बद्रीनाथ जगताप आणि मच्छिंद्रनाथ मल्टीस्टेट चे व्हाईस चेअरमन युवा नेते गणेश नाना शिंदे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.