व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

शिक्षकांच्या “एकता” ने “सदिच्छा” चा दणदणीत विजय;स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्थेचा निकाल जाहिर

सदिच्छा पॅनलचे १५ तर एकता पॅनलचे २ उमेदवार विजय

0

गणेश दळवी आष्टी-शिक्षकांची मनाची व महत्वाची असलेली अर्थसंजीवनी स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्थेची निवडणूक जाहिर होऊन या निवडणूकीत एकास एक उमेदवार म्हणजे आमदार धस यांचा सदिच्छा पॅनल तर आ.बाळासाहेब आजबे यांचा एकता पॅनलची सरळ लढत होऊन या अटीतटीच्या निवडणूकीत “सदिच्छा पॅनलचे १५ तर एकता पॅनलचे २ उमेदवार विजय झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बी.एम.राऊत यांनी जाहिर केले.
आष्टी तालुक्यातील स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी संस्थेची निवडणूक गेल्या महिना भरापूर्वी जाहिर झाली होती.त्या निवडणूकीचे दि.१४ जानेवारी रोजी घेण्यात येऊन,निकालही याच दिवशी राञी उशीरा जाहिर करण्यात आला.हि निवडणूक अत्यंत खेळी मेळीच्या वातावरणात होऊन,शिक्षक मतदाराने शेवट पर्यंत विजय कोण होईल याची चुणूक सुध्दा कुणाला लागू दिली नाही.या निवडणूकीत ९८९ मतदार होते.त्यातील १ मतदार मयत १२ मतदार विविध कारणांनी येऊ न शकल्याने एकूण ९७६ मतदारांनी आपला कडा व आष्टी येथे मतदानाचा हक्क बजावला.मतदान प्रक्रीया पुर्ण झाल्यानंतर राञी ६ वा.मतमोजणीस सुरूवात करण्यात आली.राञी उशीरा ११ वा.मतमोजणी प्रक्रीया पुर्ण झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.