व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टीत सुरू झालेल्या कांदा आडतीने शहराचा चेहरा-मोहरा बदलून जाईल-आ.सुरेश धस

आष्टी येथील उपबाजार पेठेत कांदा खरेदीस सुरूवात

0

click2ashti update-कांदा आडत सुरू झाल्याने बाजार समितीसह शहरातील छोट-छोट्या व्यावसायिकांना याचा फायदा होणार आहे.परंतु यासाठी जेवढी जबाबदारी बाजार समितीची आहे तेवढीच जबाबदारी शहरातील व्यापा-यांचीही आहे.त्यामुळे शहराचा चेहरा मोहरा बदलण्यास वेळ लागणार नाही.आता यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगर पंचायतनेही पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले.

कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार पेठेत असलेल्या आष्टी शहरात आज शुक्रवार दि.१९ रोजी सकाळी ११.३० वा.कांदा खरेदी खरेदी विक्री सुरू करण्याचा शुभारंभ आ.सुरेश धस यांच्याहस्ते करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आ.साहेबराव दरेकर,युवानेते जयदत्त धस,भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव म्हस्के,नगराध्यक्ष जिया बेग,शांतीलाल मुथ्था,अजिनाथ सानप,माजी जि.प.अध्यक्ष सय्यद आब्दुल्ला,व्यापारी संघटनेचे संजय मेहेर,कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी,उपसभापती नवनाथ धोंडे,सचिव हनुमंत गळगटे,राम मधूरकर,उपनगराध्यश शैलेश सहस्ञबुद्दे यांच्यासह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,आजचा दिवस सुवर्णक्षणांनी लिहवा असा योग आला आहे.आष्टीच्या व्यापारपेठेत ह्या कांदा व्यापाराने शहर सुधारेल त्यासाठी शहरातील व्यापारी आणि पदाधिकारी यांनी यासाठी प्रयत्न करण्याचे गरज आहे.आष्टीच्या प्रमुख लोकांनी आत्ता सुरू केलेली बाजारपेठ बंद पडता कामानये यासाठी सगळ्यांनी आपली जबाबदारी म्हणून पार पाडावी,कडा कृषी उत्पन्न बाजार समिती आम्ही एका चहाच्या हाॅटेलवर सुरू केली होती.आता तिथील परिस्थिती पाहा आणि आता तिथे कसा बदल झाला हे आपण सर्वजण पाहत आहोत.आता आपली आष्टीची बाजारपेठही अशीच बदल झाल्याशिवाय राहणार नाही.थोडावेळ लागेल पण शहराचा चेहरा मोहरा बदलून या बाजार पेठेमुळे शहरातील सर्वच छोट-छोट्या व्यावसायिकांना होणार आहे.

कडा कृषी उत्पन्न बाजार समितीने आता डिजीटल सोशल मिडीयाचा वापर करून आपल्या बाजार पेठेचा भावफलक व्हाट्सअप, फेसबुकवर दररोजच्या दररोज जाहिर करावा जेणे करून या बाजार भावाची माहिती शेतक-यांना मिळेल आणि त्याचा फायदा बाजार पेठेला नक्की होईल असेही आमदार धस यांनी सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आ.साहेबराव दरेकर म्हणाले,आष्टीमध्ये नव्याने सुरू केलेली उपबाजारपेठ ती कशी फुलवायची यासाठी शेतकरी व व्यापारी यांनी मनावर घेऊन ती फुलविण्याची गरज असून,यातील व्यवव्हार सुरूळीत आणि विश्वासनीय ठेवले तर या बाजार पेठेचे वटवृक्षात रूपातंर झाल्याशिवाय राहणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक सभापती रमजान तांबोळी म्हणाले,नेहमीच कडा कृषी उत्पन्न बाजार समिती ही आष्टी शहराकडे दुर्लेक्ष करत असल्याचे आरोप होतात.ते आम्ही आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली पूसून काढण्याचे काम करत आहोत.आता या सूरू केलेल्या आडतीकडे गावक-यांनीही लक्ष दिले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी अॅड.साहेबराव म्हस्के,अजिनाथ सानप,यांच्यासह आदिनीं मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी पंचायत समिती सभापती बद्रीनाथ जगताप,जि.प.सदस्य अमरराजे निंबाळकर,चेअरमन अरूण सायकड,परिवंत गायकवाड,खंडू जाधव,राहुल मुथ्था,सुनिल मेहेर,नगरसेवक रंगनाथ धोंडे,भारत मुरकूटे,सुरेश वारंगुळे,मुर्शदपूर सरपंच अशोक मुळे,ईरशान बेग,कपिल आग्रवाल,सचिन काकडे यांच्यासह आदि उपस्थित होते.पहिल्या दिवशी आणलेल्या शेतक-यांनी या प्रातिनिधीक स्वरूपात जालिंदर सोमासे कासारि,महादेव सांगळे क-हेवाडी, वैजिनाथ धनवडे आष्टी,दादासाहेब पोकळे या शेतक-यांचा सन्मान मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.